नरेंद्र मोदींसाठी भाजप कार्यकर्त्यानेही केले नाही असे कठोर तप विनोद कुमारचे, चार दिवस अन्न अन् पाणी सोडले

| Updated on: May 31, 2024 | 11:11 AM

Fast For PM Modi: विनोद कुमार यांनी झालावाडमधील बकानीतील त्यांच्या घराजवळ एका झोपडी तयार केली. त्याठिकाणी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तिथे हवन आणि पूजा सुरू केली.

नरेंद्र मोदींसाठी भाजप कार्यकर्त्यानेही केले नाही असे कठोर तप विनोद कुमारचे, चार दिवस अन्न अन् पाणी सोडले
विनोद कुमार यांनी उपोषण सोडले
Follow us on

लोकसभा निवडणुकाचा प्रचार गुरुवारी संपला. आता शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवारी १ जून रोजी होणार आहे. प्रचार संपल्यानंतर भाजप आणि काँग्रेसकडून आढवा घेतला जात आहे. बैठका घेतल्या जात आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका चाहत्याने केलेल्या उपोषणाची बातमी आली आहे. राजस्थानमधील कडकडीत उन्हात त्यांनीनरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तप केले आहे. या तपासाठी चार दिवस अन्न आणि पाणी घेतले नाही. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यावर भाजप नेते पोहचले. त्यांना ज्यूस देऊन त्यांचे तप सोडले. विनोद सेन असे त्या चाहत्याचे नाव आहे.

अन्न आणि जलही सोडले

राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात राहणारे विनोद कुमार सेन यांचा सलूनचा व्यवसाय आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते आहे. राजस्थानमध्ये अनेक भागांत तापमान ५० अंश सेल्सियसवर गेले आहे. त्यावेळी विनोद कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तप सुरु केले. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अन्न आणि जल सोडले. चार दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हवन आणि पुजा करत राहिले. त्याची माहिती भाजप नेत्यांना मिळाल्यानंतर ते त्यांना भेटण्यासाठी पोहचले.

शूगर लेव्हल कमी

भाजप नेता नरेंद्र नागर यांनी विनोद कुमार यांना फळांचा रस देऊन त्यांचे तप पूर्ण केले. विनोद कुमार यांनी झालावाडमधील बकानीतील त्यांच्या घराजवळ एका झोपडी तयार केली. त्याठिकाणी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तिथे हवन आणि पूजा सुरू केली. चार दिवस पोटात पाणी आणि अन्नाच्या कण नव्हता. यामुळे कुटुंबियांना त्यांची काळजी वाटू लागली. त्यांनी डॉक्टरांना बोलले, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर शुगर लेव्हल कमी झाल्याचे समजले.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांनी त्यांना अन्न पाणी घेण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे विनोद कुमार यांच्या तपाची माहिती परिसरातील लोकांना मिळाली. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी लोक येऊ लागले. त्यानंतर भाजप नेते आले. त्यांनी उपोषण सोडले आणि म्हणाले, मला कधीतरी पंतप्रधानांना भेटायचे आहे. याआधीही नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी विनोद सेन यांनी केस वाढवले होते. विनोद सेन हे त्यांच्या कुटुंबासह बकानी शहरात अनेक वर्षांपासून राहतात. गावात त्यांचे स्वतःचे हेअर सलूनचे दुकान आहे.