नवी दिल्ली: देशात नव वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. 1 जानेवारीपासून 100 टक्के टोल फास्टॅगद्वारे वसूल केला जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार असून सुट्ट्या पैशांची डोकेदुखीही थांबणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज ही महत्त्वाची घोषणा केली आहे. (FASTag to be mandatory for all vehicles from January 1: Nitin Gadkari)
येत्या 1 जानेवारी 2021पासून देशात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही. याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. सध्याच्या घडीला देशात फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच 80 टक्के रकमेची वसुली फास्टॅगद्वारे केली जात आहे.
नव्या वर्षात तुम्ही जर बाहेर जाणार असाल आणि तुमच्या वाहनामध्ये फास्टॅग नसेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सध्या टोलनाक्यावर अनेकदा टॅग नसतानाच फास्टॅगच्या मार्गिकेत अनेक लोक घुसताना दिसतात. वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे असं होत असतं. मात्र, 1 जानेवारीपासून हे चित्रं दिसणार नाही.
फास्टॅग म्हणजे काय रे भाऊ?
वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.
फास्टॅग कुठे खरेदी कराल? कसे रिचार्ज कराल?
NHAI आणि 22 वेगवेगळ्या बँकेतून तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. त्याशिवाय Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग NHAI प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल तर चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ NEFT/नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर Paytm वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते.
किती रिचार्ज करणार? वैधता किती?
तुमच्या फास्टॅग अकाऊंटमध्ये तुम्हाला किमान 100 रुपये ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बँक त्यांच्या हिशोबाने रक्कम कट करेल. जर तुम्ही 200 रुपयांत एखाद्या बँकेतून फास्टॅग खरेदी केला तर तुम्हाला करही भरावा लागणार आहे. फास्टॅगची वैधता नसते. (FASTag to be mandatory for all vehicles from January 1: Nitin Gadkari)
फास्ट टॅगशिवाय मार्गिकेत घुसल्यास?
तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला कोणीच मार्शल लाईनमध्ये घुसू देणार नाही. जर तुम्ही चुकून फास्टॅगच्या मार्गिकेत घुसल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. (FASTag to be mandatory for all vehicles from January 1: Nitin Gadkari)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 24 December 2020https://t.co/23HE3koY4t #mahafastnews #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2020
संबंधित बातम्या:
FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…
1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांना FASTag बंधनकारक, मोदी सरकारचा मोठा निर्णय
आंदोलनाचा 29 वा दिवस, आता शेतकऱ्यांचं विद्रोह रुप, उपमुख्यमंत्र्यांच्या हॅलिपॅडची जागा खोदली
(FASTag to be mandatory for all vehicles from January 1: Nitin Gadkari)