‘मुंह छुपाकर दारू पी रहीं’… KBC मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराची पोस्ट, काँग्रेस भडकली

| Updated on: Aug 31, 2024 | 5:19 PM

अमिता सिंह तहसीलदार आहेत, त्यांनी त्यांच्या मर्यादा ओळखाव्यात. त्यांनी प्रशासकीय कामे पार पाडावी. ज्योतिरादित्य सिंधिया यांना खूश करून काही काळ त्या ठिकाणी नोकरी करु शकतील. परंतु त्यांना प्रशासनात दीर्घ कारकीर्द करावी लागणार आहे.

मुंह छुपाकर दारू पी रहीं... KBC मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराची पोस्ट, काँग्रेस भडकली
अमिता सिंह
Follow us on

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती (केबीसी) शोमध्ये मध्य प्रदेशातील तहसीलदार अमिता सिंह यांनी 50 लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. सध्या त्या मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील कुंभराजमध्ये कार्यरत आहे. आता सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात पोस्ट केली होती. त्यावरुन वाद निर्माण झाल्यावर ती पोस्ट डिलिट केली आहे. तसेच आपले सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमिता सिंह यांच्या पोस्टमुळे काँग्रेस संतापली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ या व्हायरल पोस्टची पुस्टी करत नाही.

काय होती अमिता सिंहची पोस्ट

अमिता सिंह यांनी पोस्टमध्ये फोटो अन् कॅप्शन दिले होते. त्या फोटोमध्ये प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा दिसत आहे. अमिता सिंह यांनी प्रियंका गांधींवर टीका करत म्हटले आहे की, कॅमेऱ्याचा समोर येताच तोंड लपवून प्रियंका गांधी लंडनमध्ये दारु पित आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनाही लक्ष केले आहे. त्यात लिहिले आहे की, बकरी आणि गोमांस खाणारे ब्राह्मण राहुल गांधी आणि वाड्रा कुटुंब १०० कोटी हिंदूंच्या देशावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहेत.

अमिता सिंह म्हणतात, सायबर सेलकडे तक्रार करणार

अमिता सिंह यांच्या पोस्टवरुन वाद वाढल्यानंतर त्यांनी पोस्ट डिलिट केली. त्यांनी म्हटले की, महसूल विभागातील कामांमुळे माझा मोबाइल बऱ्याच वेळा इतरांकडे राहतो. त्यावेळी कोणीतरी त्याचा क्लोन तयार करत माझा मोबाईल हॅक करुन ती पोस्ट केली. मी माझ्या सर्व मित्रांना कळवू इच्छिते की माझा फेसबुक आयडी हॅक झाला आहे. कोणीतरी माझा क्लोन आयडी तयार करून राजकीय हेतूने प्रेरित पोस्ट करत आहे. यासंदर्भात मी सायबर सेलकडे तक्रार करत आहे.

काँग्रेस संतापली, अमिता सिंह यांनी सुनावले

काँग्रेसचे माध्यम सल्लागार के. के. मिश्रा म्हणाले की, अमिता सिंह तहसीलदार आहेत, त्यांनी त्यांच्या मर्यादा ओळखाव्यात. त्यांनी प्रशासकीय कामे पार पाडावी. ज्योतिरादित्य सिंधिया यांना खूश करून काही काळ त्या ठिकाणी नोकरी करु शकतील. परंतु त्यांना प्रशासनात दीर्घ कारकीर्द करावी लागणार आहे. तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकता. तुम्ही महिला आहात, तुमच्या मर्यादेत काम करा. त्यांना प्रशासकीय कामे करायची नसतील तर राजकारणात यावे. तसेच सरकारने त्यांची कुठेही नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची मानसिक तपासणी करावी.