नवी दिल्ली | आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांना देशात मोठ्या प्रमाणावर महत्व दिले जात आहे. यासंदर्भात आयोजित केलेले डिजिटल एक्सेलेरेशन अँड ट्रांसफॉर्मेशन एक्सपोचे उद्घघाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. ‘DATE 2023’ चे उद्घाटन नवी दिल्लीत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यामध्ये नवी दिल्लीतील यशोभूमीत सर्वात प्रभावशाली आणि नवीन उद्योजक यांना एकत्र आणले जात आहे. स्टार्ट-अप, गुंतवणूकदार, उद्योजक आणि धोरणकर्ते या सर्वांना एकाच छाताखाली आणण्यात आले आहे.
DATE चे रणनीतिक भागीदार सायबरवर्स फाउंडेशचे अध्यक्ष यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, संजीव सान्याल आणि सरकारी अधिकारी, धोरणकर्ते यांच्यामुळे भारताच्या प्रगतीसाठी DATE महत्वाची भूमिका बजावत आहे. भारत डिजिटलकडे वाटचाल करत आहे.
ट्रेस्कॉनचे संस्थापक आणि अध्यक्ष मोहम्मद सलीम यांनी म्हटले की, “DATE हे भारतातील डिजिटल क्रांतीसाठी महत्वाचे काम करत आहे. या 3000+ पेक्षा जास्त स्टार्टअप, 500+ गुंतवणूकदार, 100+ प्रदर्शक आणि भागीदार 100+ तज्ज्ञ आणि धोरणकर्त्य एकत्र आले आहे. या सर्वांना ऐकण्यासाठी DATE महत्वाची भूमिका बजावत आहे. भारताला आर्थिक प्रगतीकडे नेण्यासाठी हे महत्वाची भूमिका बजावत आहे.
ट्रेसकॉनचे ग्रुप सीईओ नवीन भारद्वाज यांनी सांगितले की, “DATE हा एक महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. जेव्हा भारतीय GDP $4 ट्रिलियनच्या पुढे गेला आहे. जागतिक नेत्यांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी DATEची भूमिका महत्वाची आहे. यासाठी अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नेत्यांची उपस्थिती आणि पाठिंबा महत्वाचा आहे. भारतातील सर्वात प्रभावी B2B टेक एक्स्पो आहे. यात नेहमी वाढ होत राहणार आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया आयटी एसोसिएशन, डेटा सिक्योरिटी काउंसिल ऑफ इंडिया, फेडरेशन ऑफ आईटी एसोसिएशन ऑफ गुजराती, गोवा टेक्नोलॉजी एसोसिएशन, गुजरात इलेक्ट्रॉनिक्स एंड सॉफ्टवेयर इंडस्ट्रीज एसोसिएशन, एसीआईसी राइज एसोसिएशन, फिनटेक एसोसिएशन ऑफ जापान, इंटरनेशनल फेडरेशन ऑफ इन्वेस्टर्स एसोसिएशन, हैशटैगवेब3.ओआरजी, लंदन इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग एंड फाइनेंस, इंडिया स्मॉल बिजनेस एंड फ्रेंचाइजी एसोसिएशन