मुंबई : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग ( Anantnag Kashmir Encounter ) येथे शोध मोहिमेदरम्यान मेजरआशिष धौनचक चकमकीत शहीद झाले. ते पानिपत जिल्ह्यातील रहिवासी होते. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. मेजर आशिष हा त्याच्या तीन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. मेजर आशिष यांना दोन वर्षांची मुलगी आहे. पीएम मोदी यांच्याकडे संतप्त गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
शहीद मेजरचे काका दिलावर सिंह यांनी म्हटले की, त्यांचे आशिष सोबत काही दिवसांपूर्वीच बोलणे झाले होते. आशिष ऑक्टोबरमध्ये घरी येणार होता. कारण तो भाड्याच्या घरात राहत होता त्याला नवीन घरात शिफ्ट व्हायचे होते.
संपूर्ण देशाला अभिमान
आशिषच्या आजोबांनी सांगितले की, मला आणि संपूर्ण देशाला आशिषचा अभिमान आहे. सरकारने त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आशिष जेव्हा कधी घरी यायचा तेव्हा तो सगळ्यांसोबत असायचा. तो खूप मनमिळाऊ होता.
पंतप्रधानांकडे मागणी
आशिषचे शेजारी नरेंद्र म्हणाले की, आज संपूर्ण देशाला आशिषच्या हौतात्म्याचा अभिमान आहे, पण आता काळ बदलला आहे. देशाने असे कठोर पाऊल उचलले पाहिजे. आता पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.