लखनौ- लखनौत एका पिटबिुल जातीच्या कुत्र्याने (Pitbul Dog) आपल्या 80 वर्षांच्या मालकीणीची (owner) लचके तोडून हत्या केल्याचा (woman dead)दायक प्रकार घडला आहे. मृत महिलेचे नाव सुशीला त्रिपाठी असे असून मंगळवारी घडलेल्या या घटनेनं सगळेच जण हादरले आहेत. सुशीला त्रिपाठी यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी हा प्रकार त्यांच्या डोळ्याने पाहिला होता. आता त्यांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, या पिटबुलने त्याच्या मलकिणीवर जेव्हा हल्ला केला, तेव्हा या कुत्र्यांच्या तोंडात लचक्यावेळी त्यांचे मास आले. त्यानंतर बराच काळ या वृद्ध महिलेचे मास हा कुत्रा खात होता. अशी माहिती शेजारच्यांनी दिली आहे.
हा प्रकार घडला त्यावेळी 80 वर्षांच्या सुशीला त्रिपाठी या घरात एकट्या होत्या. यावेळी या पिटबुल कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. पूर्ण ताकद लावून या कुत्र्याने सुशीलाबेन यांना जमिनीवर पाडले. त्यानंतर पिटबुलने त्यांच्या शरिराचे लचके तोडण्यास सुरुवात केली. त्यांचे मास त्याच्या तोंडाला लागल्यानंतर, पिटबुलने त्यांच्या सगळ्या शरिराचे लचके तोडले.
एका शेजारच्याने सांगितले की – त्यांचे कळवळणे ऐकून बाहेर आलो तेव्हा पाहिले की पिटबुलने सुशीला त्रिपाठी यांच्यावर हल्ला केला होता आणि त्यांच्या शरिरातून रक्त बाहेर येत होते. त्या घाबरुन पडलेल्या अवस्थेत होत्या. जखमेमुळे त्या ओरडत होत्या. आम्ही पिटबुलला दगड मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबला नाही, तो मास खातच राहिला. एक तास शेजारचे त्याला दगडं मारत होते, त्यानंतर त्याने सुशीला यांचा मृतदेह घरात खेचून नेला. सुमारे एक तास हा कुत्रा त्यांचे लचके तोड होता.
पिटबुल इतका खतरनाक होता की त्याला कधी बाहेर काढण्यात येत नव्हते. त्याला नेहमी घरातच बांधून ठेवत असत. मंगळवारी हल्ला झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर दगडं मारली, पण तो थांबला नाही. तो मलकीणीचे लकचे तोडत होता, तो नरभक्षक झाला, असे वाटते. आता त्या घटनेनंतर आता आम्हाला इथे राहायची भीती वाटते आहे. आम्ही दहशतीत आहोत, महापालिकेने तो कुत्रा इथून घेऊन जायाला हवा. असे दुसऱ्या एका शेजाऱ्याने सांगितले आहे.
आता या प्रकरणात पिटबुलच्या मालकाला नोटीस पाठवण्यात येणार आहे. याच मालकाच्या घरात त्याच्या वृद्ध आईचे लचके या पिटबुलने तोडले आहेत. त्याच्याकडे जर परवाना नसेल तत त्याच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.