गोवा : गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू झाला. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर (Goa Beach) अनेक पर्यटक (Tourists) आनंद लुटण्यासाठी येतात. समुद्रात मजा करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण बुडाल्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना उघडकीस आली. चार तरुण समुद्रात आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरले. पण, त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पालकांच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने ते चांगलेच हादरले आहेत.
उत्तर गोव्यातील पेडणे -केरी समुद्रकिनाऱ्यावर ४ गोमंतकीय बुडाले. वखीर अली (२४) आणि सबिना खातू (२०) यांचे मृतदेह सापडले. बचावलेल्या आसिफ या तरुणाला गोमेकॉत हलविण्यात आले आहे.
गोव्यातील केरी समुद्रात 4 मुले बुडाले. घटनास्थळी शोध कार्य चालू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुले समुद्रात बुडू लागल्याचे समजताच पालकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
एकाच कुटुंबातील ही मुले आहेत. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले. अन्य एकाचा शोध सुरु आहे. ही मुले कुठली होती? त्यांच्यासोबत कोण होते याबाबत वृत्त लिहेस्तोवर माहिती समोर आली नाही.
समुद्रकिनारा म्हटलं की, मजा करण्याचे ठिकाण समजले जाते. परंतु, हाच समुद्रकिनारा कधीकधी घातक ठरतो. या तरुणांच्या बाबतीतही असेल घडले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अतिशय दुःख झाले. एकाच कुटुंबातील हे चारही जण असल्याची माहिती समोर येत आहे.
हे कुटुंबीय समुद्रकिनाऱ्यावर एंजाय करण्यासाठी आले होते. पण, चार तरुण बुडाल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी तरुणांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण, पालक त्यात यशस्वी होऊ शकले नाही. पालकांच्या डोळ्यासमोर तरुण बुडत होते. त्यांनी जोराने टाहो फोडला. आजूबाजूचे मदतीसाठी धावले. पण, त्यांनी मदतही व्यर्थ ठरली.