G20 Summit : दिल्लीत लॉकडाऊन नाही, मात्र कानाकोपऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

| Updated on: Sep 05, 2023 | 5:06 PM

दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार्‍या G20 बैठकीत राजधानीत लॉकडाऊन सारखी परिस्थिती राहणार नाही.

G20 Summit : दिल्लीत लॉकडाऊन नाही, मात्र कानाकोपऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त
Follow us on

G20 Summit : G-20 बैठकीची तयारी जोरात सुरू आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या भारत मंडपममध्ये होणाऱ्या या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेते सहभागी होणार आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी सुरक्षा यंत्रणानी ही तयारी केली आहे . 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार आहेत. पण अशा परिस्थितीत सोशल मीडियावर काही अफवा देखील पसरवल्या जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नवी दिल्ली जिल्हा कंटेनमेंट झोन असेल, परंतु या भागात रहिवाशांच्या हालचालींना परवानगी असेल. मेट्रो आणि अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. यासोबतच वैद्यकीय दुकाने, दुधाची दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाला आणि फळांची दुकाने यासह अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

सर्वत्र कमांडो तैनात

दिल्ली G20 बैठकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात केले गेले आहेत. पाहुण्यांना राहण्यासाठी हॉटेलच्या आसपास कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या बैठकीसाठी 20 सदस्य राष्ट्रांचे नेते या उपस्थित राहणार आहेत.