नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर भारत आज पुन्हा नवा इतिहास रचणार आहे. भारताचं गगनयान मिशन थोड्याच वेळात सुरू होणार आहे. श्रीरहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयानची पहिली उड्डाण चाचणी करणार आहे. पहिली उड्डाण चाचणी अॅस्ट्रोनॉटसाठी बनवण्यात आलेल्या क्रू मॉड्यूलला आपल्यासोबत घेऊन जाईल. क्रू मॉड्यूलची लँडिंग बंगालच्या खाडीत होईल. नौसेना तिथे या क्रू मॉड्यूलच्या लँडिंगची रिकव्हरी होणार आहे.
गगनयान मिशची पहिली टेस्ट फ्लाईट सकाळी 8 वाजता रवाना होईल. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ही माहिती दिली. 21 ऑक्टोबर रोजी टीव्ही-डी1 परीक्षण उड्डाणानंतर गगनयान कार्यक्रमानुसार तीन आणखी परीक्षण यान मिशन सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेत एकूण दोन मानवरहीत उड्डाणं असणार आहेत.
या गगनयान मिशननुसार इस्राने मानवी दल पृथ्वीच्या 400 किलोमीटरच्या कक्षेत यशस्वीपणे पाठवण्याची योजना तयार केली आहे. परीक्षण यानाच्या उड्डाणाचा उद्देश क्रू मॉड्यूलचे परीक्षण करणे हा आहे. पुढच्यावर्षीच्या अखेरपर्यंत मानव अंतराळ उड्डाणच्यावेळी भारतीय अंतराळ यात्रींना अंतराळात घेऊन जाणार आहे. त्यासाठी हे परीक्षण केलं जात आहे.
टीव्हीडी-1 परीक्षण उड्डाणामध्ये मानव रहीत क्रू मॉड्यूलच्या बाहेर अंतराळात प्रक्षेपित करणे, त्याला पृथ्वीवर परत आणणे आणि बंगालच्या खाडीत उतरवणे आणि तिथून सुरक्षित बाहेर काढणे आदी गोष्टी केल्या जाणार आहेत. नाविक दलाने मॉड्यूलला पुन्हा प्राप्त करणअयासाठी मॉक ऑपरेशन आधीच सुरू केलं आहे.
चांद्रयान-3 च्या यशानंतर संपूर्ण जगाचं लक्ष इस्रोच्या मिशनवर लागलं आहे. या मिशनमुळे मानवाला अंतराळात पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या ट्रायलवेळी काही गोष्टींवर लक्ष ठेवलं जाणरा आहे. कुणाचा क्रू एस्केप सिस्टिम योग्य तऱ्हेने काम करत नाही हे पाहिलं जाणार आहे. त्यामुळे पुढील मिशनच्यावेळी येणारे अडथळे दूर केले जाणार आहेत.
‘इन-फ्लाइट एबॉर्ट डिमॉन्स्ट्रेशन’ 8.8 मिनिटे चालणार आहे. पहिली उड्डाण चाचणी 1,482 किमी प्रति तासाच्या स्पीडने केली जाणार आहे.
क्रू एस्केप सिस्टम (सीईएस) क्रू मॉड्यूल (सीएम)च्यासह 11.7 किमीच्या उंचीवर टेस्ट वाहन (टीवी)हून स्वतंत्र होणार
एबॉर्ट सिक्वेंस स्वत:पासून सीईएस, सीएम सेपरेशन 16.6 किमीवर सुरू होील. श्रीहरिकोटा किनारपट्टीवरून जवळपास 10 किमी अंतरवार समुद्रात पॅराशूट तैनात केले जातात आणि क्रू मॉड्यूल खाली कोसळतं.
भारतीय नाविक दलाची टीम स्प्लॅशडाउननंतर क्रू मॉड्यूल रिकव्हर करेल. तर क्रू एस्केप सिस्टम आणि टेस्ट व्हेईकलचे अनेक भाग समुद्रात बुडणार आहेत.