मुरादाबाद : दीड महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या महिलेने मोठा दावा केला आहे. यामुळे पोलीस यंत्रणाही हादरली आहे. तिच्या पतीने मित्रांना गँगरेप करायला लावल्याचा दावा महिलेने केला आहे. पोलिसांनी या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तसेच गुन्हाही दाखल केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. मुरादाबादमध्ये दीड महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेने तिच्या पतीवर आरोप गंभीर आरोप केला आहे. तिच्या पतीने त्याच्या मित्रांना सामूहिक बलात्कार करायला लावल्याचा हा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून शुक्रवारी पती, सासरे आणि मित्रांसह 11 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
पीडीत महिलेने 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्या समाजातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर दोन दिवसांनी सासरच्या घरी तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. तिला जातिवाचक शब्द वापरून सासरच्या मंडळींनी तिचा अपमान केला गेला. त्यावेळी पीडीत महिलेने पोलिसांना फोन केला. मग सासरच्यांनी पोलिसांसमोर माफी मागितली अन् पुन्हा असे न करण्याचे मान्य केले. त्यानंतर ती महिला मुरादाबादला परतली. मुरादाबादमध्ये भाड्याचे घर घेऊन पतीसोबत राहू लागली.
त्या दिवशी काय केले
22 मार्च रोजी पीडीत महिलेची तब्येत अचानक बिघडली. पतीने तिला डॉक्टरांना दाखवू अन् औषध घेऊ, असे सांगून नेले. रस्त्यात तिला शीत पेय दिले. त्यात उत्तेजक पदार्थ टाकला होता. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर ती महिला शेतात दिसली. तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तीन तरुण तिच्यावर बलात्कार करत असताना पती शेताबाहेर उभा राहून चौकीदारी करत होता,असे महिलेने म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.