गॅस सिलेंडर अक्षरश: पुराच्या पाण्यात वाहून गेले, भयानक पाऊस, पाहा धक्कादायक VIDEO

| Updated on: Jul 22, 2023 | 7:39 PM

हिमाचल प्रदेशमधील पुराचे व्हिडीओ गेल्या आठवड्यात समोर आले होते. संबंधित व्हिडीओ पाहून संपूर्ण देश हादरला होता. विशेष म्हणजे आता पावसाने गुजरातमध्ये देखील थैमान घालायला सुरुवात केली आहे. गुजरातमधील पुराचे काही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गॅस सिलेंडर अक्षरश: पुराच्या पाण्यात वाहून गेले, भयानक पाऊस, पाहा धक्कादायक VIDEO
Follow us on

नवसारी | 22 जुलै 2023 : गुजरातमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. जुनागड येथे पावसाचे धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहेत. जुनागडमध्ये मोठमोठ्या चारचाकी कार पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच एक व्यक्ती आपल्या कारसोबत पाण्यात वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आलाय. असं असताना आता गुजरातच्या नवसारी इथला धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. नवसारीत गॅस सिलेंडरच्या गोडाऊनमधून गॅस सिलेंडर वाहून जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अतिशय थरारक असा हा व्हिडीओ आहे. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर पाऊस किती भयंकर कोसळतोय याचा अंदाज येईल.

गॅस सिलेंडरचं वजन किती असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण पाऊस इतका कोसळतोय की हे गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यात अतिशय अलगद तंरगत आहेत. तसेच ते अतिशय वेगाने पुराच्या पाण्यात वाहून जात आहेत. हा व्हिडीओ खरंतर थरकार उडवणारा असाच आहे. गॅस सिलेंडर इतक्या भयानक पद्धतीने वाहून शकतो, मग माणसांनादेखील मोठा धोका उद्भवू शकतो. प्रशासन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण गुजरातमधील पुराचे व्हिडीओ धक्कादायक आहेत.

नवसारीचा गॅस सिलेंडर वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ

जुनागडमध्ये पावसाचा हाहा:कार

गुजरातच्या जुनागड येथे कालवा नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. या पुराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लहान मुलांच्या खेळण्यातल्या गाड्यांसारख्या अनेक कार पाण्यावर तरंगताना आणि वाहून जाताना दिसत आहेत. याशिवाय एकीकडे नदीला पूर आलाय तर दुसरीकडे मुसळधार पाऊस देखील सुरु आहे. त्यामुळे प्रशासनापुढील आव्हानं वाढली आहेत.

जुनागडमध्ये एक व्यक्ती वाहून गेली

जुनागडमधला आणखी एक मन हेलावणारा व्हिडीओ समोर आलाय. एक व्यक्ती त्याच्या कारसोबत वाहून गेली आहे. या व्हिडीओत व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती आक्रोश करत असल्याचा आवाज येतोय. तर समोर पाण्याच्या प्रवाहात एक कार आणि त्यासोबतची व्यक्ती वाहून जाताना दिसत आहे. मन सुन्न करणारा असा हा व्हिडीओ आहे.

पाण्याच्या प्रवाहात गुरे-ढोरे वाहून गेले

जुनागडच्या पुराचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यापैकी आणखी एक व्हिडीओ हा मनाचा थरकार उडवणारा आहे. पुराच्या पाण्यात जीवंत म्हशी वाहून जाताना दिसत आहेत. यावेळी अनेकजण आरडाओरड करत आहेत. पण पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की कुणीच या म्हशींना वाचवू शकत नाही.