Gautam Adani Bribery case: गौतम अदानींवरील भ्रष्टाचाराचे आरोप काय? अरेस्ट वॉरंट का? सविस्तर समजून घ्या प्रकरण..

| Updated on: Nov 22, 2024 | 12:30 PM

अमेरिकेच्या सहाय्यक सरकारी वकील लिझा मिलर यांनी न्यूयॉर्कमधील न्यायालयात गौतम अदानींच्या लाचखोरप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्याचे पडसाद आता भारतातही उमटले आहेत. गौतम अदानींवरील भ्रष्टाचाराचे आरोप किती गंभीर आहेत आणि त्यांच्या कंपन्यांवर काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात..

Gautam Adani Bribery case: गौतम अदानींवरील भ्रष्टाचाराचे आरोप काय? अरेस्ट वॉरंट का? सविस्तर समजून घ्या प्रकरण..
Gautam Adani
Image Credit source: Instagram
Follow us on

ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटं मिळवण्यासाठी भारतातील काही राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना सुमारे 265 दशलक्ष डॉलरची (2200 कोटी रुपये) लाच दिल्याप्रकरणी गौतम अदानींसह त्यांच्या सात अधिकाऱ्यांना अमेरिकी न्याय विभागाने दोषी ठरवलं आहे. भारतामध्ये सौरऊर्जा प्रोजेक्ट्समधील महागडी वीज राज्यांनी खरेदी करावी, यासाठी त्या राज्यांमधील सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर झाला आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांना प्रभावित करणाऱ्या या कृत्यापासून त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोपही अदानी ग्रुपवर आहे. याप्रकरणी न्यूयॉर्कमधील न्यायालयात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या लाचखोरीप्रकरणी दोन वेगवेगळे खटले दाखल झाले आहेत. त्याचे पडसाद आता भारतातही उमटले आहेत. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केलंय. दुसरीकडे शेअर मार्केटमध्येही अदानी ग्रुपच्या शेअर्सना फटका बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं खूप नुकसान झालंय. तर अदानी ग्रुपने त्यांच्याविरोधातील हे सर्व फेटाळून लावले आहेत. कशासाठी खटला? अमेरिकेच्या सहाय्यक सरकारी वकील लिझा मिलर यांनी न्यूयॉर्कमधील न्यायालयात अदानींच्या लाचखोरप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार 2020 ते 2024 या काळात अदानी ग्रीन...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा