हिटलरपासून वाचला, सट्टेबाजीतून कमवला पैसा, मोदींवर टीका करणार कोण आहे जॉर्ज सोरोस

| Updated on: Feb 18, 2023 | 5:11 PM

सोरोस यांचे टीकाकर जगभरात आहेत. यामुळे त्यांची एनजीओ देखील वादांपासून मुक्त नाही. टीकाकारांचे म्हणणे आहे की ओपन सोसायटी फाउंडेशन इतर देशांच्या राजकारणात हस्तक्षेप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात.

हिटलरपासून वाचला, सट्टेबाजीतून कमवला पैसा, मोदींवर टीका करणार कोण आहे जॉर्ज सोरोस
george soros
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

नवी दिल्ली :  हंगेरियन-अमेरिकन वंशाचे प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोरोस यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका केली आहे. सोरोस यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वाद ओढवून घेतले आहेत. मागील काही वर्षांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकर राहिले आहेत. आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्याने बँक ऑफ इंग्लंडला संपवले आणि ज्याच्यावर आर्थिक गुन्हेगार म्हणून ठपका लागला आहे, त्याने आता भारतीय लोकशाही मोडण्याचा विडा उचलला आहे, या शब्दांत स्मृती इराणी यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

1930 मध्ये हंगेरीमध्ये जन्मलेल्या जॉर्ज सोरोस यांना नाझींच्या अत्याचाराचा सामना करावा लागला. हिटलरने 5 लाखांहून अधिक ज्यूंची हत्या केली होती. सोरोस आणि त्यांच्या कुटुंबास लष्कराचे बनावट ओळखपत्र दाखवून नाझींच्या तावडीतून बाहेर पडावे लागले. यामुळे जगभरातील गरजूंना मदत करणारी व्यक्ती बनण्याची त्यांची इच्छा होती. युद्धानंतर, हंगेरीमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सरकार बनल्यावर ते आपल्या कुटुंबाकडे लंडनला गेले. त्याठिकाणी त्यांनी रेल्वे स्टेशनवर पोर्टरचे काम केले. त्यानंतर १९५६ मध्ये ते अमेरिकेला गेले अन् आजही अमेरिकेत आहेत.

फायद्यासाठी राजकीय फंडिग

हे सुद्धा वाचा


जॉर्ज सोरोस हे हंगेरियन वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. ते अमेरिकेसह जगातील अनेक देशांतील पुरोगामी नेत्यांना राजकीय निधी देतात. यासाठी ते कंझर्व्हेटिव्ह सरकारांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बँक ऑफ इंग्लंडचे नुकसान


जॉर्ज सोरोस यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बँक ऑफ इंग्लंडचे मोठे नुकसान केले. त्यांनी 1990 मध्ये पौंड विरुद्ध सट्टेबाजी करत भरपूर नफा कमावला. यानंतर ते श्रीमंतांच्या यादीत पोहचले. यामुळे ब्रिटनमधील तज्ज्ञ सोरोस यांच्यावर टीका करतात. त्यांना करन्स मॅनिपुलेशन म्हटले जाते. त्यांच्यांवर चलन बाजारात सट्टा लावून अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा आरोप आहे.

ओपन सोसायटीचे फाउंडर

जॉर्ज सोरोस हे ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ या एनजीओची संस्थना केली. जगभरातील लोकशाही, मानवी हक्कासाठी काम करणाऱ्यांना निधी देतात. सोरोस यांचे टीकाकर जगभरात आहेत. यामुळे त्यांची एनजीओ देखील वादांपासून मुक्त नाही. टीकाकारांचे म्हणणे आहे की ओपन सोसायटी फाउंडेशन इतर देशांच्या राजकारणात हस्तक्षेप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात.

यहूदी विरोधकांचे शिकार

जॉर्ज सोरोस ज्यू म्हणजेच यहूदी आहे. दीर्घकाळापासून उजव्या विचारसरणीच्या गटांचे लक्ष्य बनले आहेत. त्यांच्यांवर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जगाचा वापर करण्याचा आरोप आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका करत नाहीत तर ते कंझर्वेटिव्ह नेत्यांचे मोठे टीकाकार आहेत. सोरोस हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही टीकाकार आहेत. आपल्या संपत्तीचा वापर राजकीय प्रभावासाठी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

अनेक देशांमध्ये अवैध व्यवसाय


जॉर्ज सोरोस जगभरातील देशांत ढवळाढवळ करण्यासाठी आपल्या अफाट संपत्तीचा वापर करतात. ही संपत्ती त्यांनी अवैध व्यवसायातून जमा केली आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. 2002 मध्ये, फ्रेंच न्यायालयाने सोरोसला अवैध व्यवसायासाठी दोषी ठरवले होते आणि त्यासाठी फ्रेंच न्यायालयाने सोरोस यांना $2.3 दशलक्ष दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयात अपील करूनही त्यांचा दंड कायम ठेवण्यात आला.

अमेरिकेतही बेसबॉल सामन्यांमध्ये पैसे गुंतवून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याच वेळी, सोरोस हे इटलीच्या फुटबॉल संघ एएस रोमाच्या संदर्भात वादात सापडले होते.

जॉर्ज सोरोस, जे मानवी हक्कांचे मोठे समर्थक आहेत. त्यांनी ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीला निधी दिल्याचा आरोप केला आहे. विविध आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी ते निधी पुरवत असल्याचाही त्यांच्यांवर आरोप आहे.