हवेलीच्या प्रत्येक कोपऱ्यात आहे गालिब, जाणून घ्या मिर्झा गालिबच्या हवेलीचा इतिहास

| Updated on: Dec 31, 2024 | 9:05 PM

प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब यांची हवेली जुन्या दिल्लीतील बल्लीमारन गल्लीत आहे. त्यांच्या सर्व शायरी या हवेलीत सजवण्यात आल्या आहे. आता भारतीय पुरातत्व विभागाने याला हेरिटेज म्हणून देखील घोषित केले आहे. या हवेलीचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊ.

हवेलीच्या प्रत्येक कोपऱ्यात आहे गालिब, जाणून घ्या मिर्झा गालिबच्या हवेलीचा इतिहास
Mirza Ghalib
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब यांना विसरणे अवघड आहे. मिर्झा गालिब यांनी अनेक दशकांपूर्वी एक प्रश्न विचारला होता. न था कुछ तो ख़ुदा था, कुछ न होता तो ख़ुदा होता डुबोया मुझको होने ने न होता मैं तो क्या होता? आणि या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत देता आले नाही. गालिब हे असे एक नाव आहे जे नाव मुघल आणि ब्रिटिशांच्या काळातही प्रसिद्ध होते.

मिर्झा गालिब हे वयाच्या अकराव्या वर्षी दिल्लीला गेले. त्यानंतर ते आयुष्यभर तिथेच राहिले. दिल्लीतील गल्ली बल्लीमारनमध्ये मिर्झा गालिब यांची हवेली आहे. जी आज एक संग्रहालय बनली आहे. गालिब वाचणारे लोक येथे वारंवार भेट देत असतात. खरी गंमत म्हणजे गालिब ज्या ठिकाणी रहात होते ती जागा त्यांनी विकत घेतली नव्हती. मिर्झा गालिब मे आग्रा येथील रहिवासी होते. असे मानले जाते सन 1797 मध्ये कालामोहन नावाच्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. गालिब यांनी 1812 मध्ये उमराव बेगमशी विवाह केला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही हवेली गालिब यांना एका हकीमाने भेट म्हणून दिला होता. गालिब आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात येथे राहत होते असं सांगितले जाते.

हवेलीतील गालिबच्या आठवणी

मिर्झा गालिब यांच्याशी संबंधित येथे अनेक आठवणी आहेत. मिर्झा गालिबच्या जीवनाशी संबंधित सर्व काही या हवेलीमध्ये कैद आहे. अगदी त्यांचे बुद्धिबळही गालिब यांच्या कुटुंबीयांचे सामान, भांडी कपडे तसेच त्यांच्या शायरी काचेच्या फ्रेम मध्ये ठेवण्यात आल्या आहे. हवेलीच्या भिंतीवर गालिबची शायरी चिटकवण्यात आली आहे.

ऐतिहासिक वारसा आहे ही हवेली

अशा महान व्यक्तीच्या हवेलीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय पुरातत्व विभागाने गालिबच्या हवेलीला हेरिटेज म्हणून घोषित केले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट इथे जपली गेली आहे. 2010 मध्ये येथे ठेवण्यात आलेल्या गालिबच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यांचा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार रामपुरे यांनी बनवला होता.