Congress : काँग्रेसला सर्वात मोठा झटका, डिबेट शो मध्ये सत्ताधाऱ्यांना भिडणाऱ्या मोठ्या चेहऱ्याने पक्ष सोडला

| Updated on: Apr 04, 2024 | 11:05 AM

"काँग्रेस पक्ष देशाच्या वेल्थ क्रिएटर्सना कमीपणा दाखवण, त्यांना शिव्या देण्याच काम करतोय. आज आपण उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणांच्या विरोधात आहोत. आपल्या देशात बिजनेस करुन पैसा कमावण चुकीच आहे का?" असा प्रश्न या नेत्याने विचारला आहे.

Congress : काँग्रेसला सर्वात मोठा झटका, डिबेट शो मध्ये सत्ताधाऱ्यांना भिडणाऱ्या मोठ्या चेहऱ्याने पक्ष सोडला
congress
Follow us on

काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते गौरव वल्लभ यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. “काँग्रेस पक्ष आज दीशाहीन होऊन पुढे चालला आहे. त्यात मला काही गोष्टी खटकतायत. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. सकाळ-संध्याकाळ वेल्थ क्रिएटर्सचा शिव्या देऊ शकत नाही. म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय” असं त्यांनी म्हटलं आहे. “मी भावुक झालो. मन व्यथित आहे. मागच्या काही दिवसांपासून पक्षाची भूमिका पटत नव्हती. पक्ष नव्या कल्पना असलेल्या युवकांसोबत स्वत:ला एडजेस्ट करत नाही” असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे. गौरव वल्लभ यांनी नेहमीच टीव्ही डिबेट शो मध्ये सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांसोबत तोडीसतोड प्रतिवाद केला आहे.

“काँग्रेसचा तळा-गाळातील संपर्क तुटला आहे. मोठे नेते आणि जनमानसात काम करणारे कार्यकर्ते यांच्यातील अंतर कमी करण कठीण आहे” असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासंदर्भातली काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसंदर्भात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर मी नाराज आहे. मी जन्माने हिंदू आणि कर्माने शिक्षक आहे. पक्षाची ही भूमिका मला पटली नाही. पार्टी आणि आघाडीतील अनेक नेते सनातन विरोधी बोलत असतात. पार्टीच यावर गप्प रहाण हे मूक संमती देण्यासारख आहे” असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे.


आपल्या देशात बिजनेस करुन पैसा कमावण चुकीच आहे का?

“सध्या काँग्रेस पक्षाची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. एकाबाजूला आपण जाती आधारीत जनगणनेबद्दल बोलतोय. दुसऱ्याबाजूला हिंदू समाज विरोधी दिसतोय. हे काँग्रेसच्या मूलभूत सिद्धांताविरोधात आहे” असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे. “सध्याच्या स्थितीत काँग्रेस पक्ष देशाच्या वेल्थ क्रिएटर्सना कमीपणा दाखवण, त्यांना शिव्या देण्याच काम करतोय. आज आपण उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणांच्या विरोधात आहोत. ही धोरण देशात लागू करण्याच श्रेय जगाने नेहमीच आपल्याला दिलं. आपल्या देशात बिजनेस करुन पैसा कमावण चुकीच आहे का?” असा प्रश्न गौरव वल्लभ यांनी विचारला आहे.