नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. परदेशी व्यापार संचालनालयाच्यामते ( DGFT ) सरकारने इलेक्ट्रॉनिक्स संबंधीत लॅपटॉप, संगणक आदी सर्व वस्तूंच्या सरसकट आयातीवर अंकुश आणला आहे. हा निर्णय अशावेळी घेतला जात आहे. जेव्हा सरकार ‘मेक इन इंडीया’ मोहिमेवर जोर देत आहे. दरम्यान, या निर्णयाचा चीनला सर्वात मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने लॅपटॉप, टॅबलेट आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर अंकुश आणला आहे. परदेशी व्यापार महासंचनालयाने यासंदर्भात नोटीफिकेशन जारी केले आहे. वैध लायसन्सच्या आधारे या वस्तूंना मर्यादित आयातीची अनूमती दिली जाईल. एचएसएम 8741 च्या अंतर्गत मोडणाऱ्या अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्यूटर आणि सर्व्हरच्या आयातीवर देखील बंदी घातली आहे.
गेल्या महिन्यात आर्थिक थिंक टॅंक जीटीआरआयने आपला अहवाल जारी केला होता. या अहवालात म्हटले होते की, आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान चीनमधून आयात होणाऱ्या लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर, इंटीग्रेटेड सर्कीट आणि सोलर सेल सारख्या इलेक्ट्रॉनिक सामानाची आयात घटली आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटीव्ह ( जीटीआरआय ) ने म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीत त्या क्षेत्रात अधिक घट झाली आहे, ज्यात पीएलआय ( उत्पादनाशी जोडलेल्या प्रोत्साहन ) योजना सुरु केल्या होत्या. तसेच सोलर सेलची आयात 70.9 टक्के घटली आहे. याच काळात लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटरची आयात 23.1 टक्के आणि मोबाईल फोनची आयात 4.1 टक्के घटली आहे.