तामिळनाडूत काय झाले, राज्यपाल विधीमंडळातून का निघून गेले?

| Updated on: Jan 17, 2023 | 5:01 PM

राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात द्रविड मॉडल', 'पेरियार', 'धर्मनिरपेक्षता' व 'आंबेडकर' या शब्दांचे वाचन केले नाही. मुख्यमंत्री स्टालिन यांनी राज्यपालांचे भाषण थांबवून आक्षेप नोंदवला. राज्यपाल जाणीवपुर्वक भाषणातील काही भाग गाळत असल्याचा आरोप स्टलिन यांनी केला.

तामिळनाडूत काय झाले, राज्यपाल विधीमंडळातून का निघून गेले?
तामिळनाडूत राज्यपाल विरुद्ध सरकार संघर्ष सुरु झाला आहे
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

चेन्नई : महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना राज्यपालविरुद्ध सरकार असा संघर्ष सुरु होता. पश्चिम बंगालमध्ये जगदीश धनखड राज्यपाल असताना ममता बॅनर्जी सरकारशी त्यांचा संघर्ष सुरु होता. आता तामिळनाडूतही (Tamil Nadu) राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरु झाला आहे. परंतु हा संघर्ष अगदी टोकाला गेला. राज्यपालांनी अभिभाषण सोडून दिले . राष्ट्रगीतासाठी ते थांबले नाही.
तामिळनाडू विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल आर.एन.रवी (RN Ravi) यांचे अभिभाषण होणार होते. या भाषणाच्या वेळी राज्यपालांनी सदस्यांना पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. डिएमके पक्षाचे आमदार ‘तामिलनाडु वाझगवे’ (तामिलनाडु अमर रहे) व ‘एंगलनाडु तामिलनाडु’ (आमची जमीन तामिलनाडू ) अशा घोषणा देऊ लागले. या घोषणा राज्यपालांच्या विरोधात होता. राज्यपाल रवी यांनी मागील आठवड्यात तामिळनाडूचे नाव ‘तमिझगन’ असावे, असे वक्तव्य केले होते.

राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात द्रविड मॉडल’, ‘पेरियार’, ‘धर्मनिरपेक्षता’ व ‘आंबेडकर’ या शब्दांचे वाचन केले नाही. मुख्यमंत्री स्टालिन यांनी राज्यपालांचे भाषण थांबवून आक्षेप नोंदवला. राज्यपाल जाणीवपुर्वक भाषणातील काही भाग गाळत असल्याचा आरोप स्टलिन यांनी केला. स्टलिन यांनी सरकारने केलेले भाषणच पटलावर गेले पाहिजे, असा प्रस्ताव तयार केला. बहुमताने हा प्रस्ताव संमत केला. या प्रस्तावाच्या विरोधात राज्यपालांनी सभागृहातून वॉक-आऊट केले.

हे सुद्धा वाचा

तामिळनाडूतही सुप्त संघर्ष : 
राज्यपाल आणि सरकार दरम्यान तामिळनाडूनही सुप्त संघर्ष सुरु आहे. राज्यपालांनी २० बिले मंजूर केली नाहीत, असा आरोप डिएमकेकडून केला जात आहे. ८ जानेवारी रोजी डिएमकेने राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

कोण आहेत टीएन रवी : 
राज्यपाल टीएन रवी इंटलिजन्स ब्यूरोचे चर्चेतील अधिकारी होते. त्यांनी उत्तर-पुर्व संघर्षात मोठे काम केले. ते ऑगस्ट २०१९ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत नागालँडचे राज्यपाल होते. नागा विद्रोहींशी संवाद साधण्यासाठी त्यांची नियुक्ती केली गेली होती. परंतु नागा विद्रोहींच्या एक गटाने त्यांच्यांशी संवाद साधाण्यास नकार दिला. त्यानंतर रवी यांना तामिळनाडूत पाठवण्यात आले. तामिळनाडून आल्यापासून त्यांचा सरकारशी संघर्ष सुरु आहे.