नवी दिल्ली : हॉटेल (hotel)आणि रेस्टॉरंटच्या बिलातून (bill) यापुढे सेवा शुल्क (service charges) देण्याची गरज लागणार नाही. बिलातून सेवा शुल्क आकारणं चुकीचं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ्यांच्या बिलासोबत यापुढे सेवा शुल्क आकारु नये, असे निर्देश केंद्र सरकारनं हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना दिले आहेत. त्यामुळे लाखो लोकांना आता दिलासा मिळणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांकडून सरसकट सेवा शुल्क घेतले जात होते. मात्र यापुढे अशाप्रकारे सेवा शुल्क न आकारण्याचे स्पष्ट निर्देश हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना देण्यात आले आहेत. परिणामी ग्राहकांवरील सेवाशुल्काचा अतिरीक्त भार कमी होणार आहे. लवकरच याबाबत आता नवी नियमावली जारी केली जाण्याची शक्यता आहे. या नियमावलीचं पालन करणं हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना करणं अनिवार्य असेल.
गुरुवारी नॅशल रेस्टॉपंट असोसिएशन ऑफ इंडियासोबत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्राहकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या सेवा शुल्कावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंत हॉटेलमध्ये ग्राहकांकडून सेवाशुल्क न आकारण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने लवकरच नवी नियमावली केंद्र सरकारकडून जारी केली जाणार आहे.
सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणारे नवे नियम बंधनकारक असणार आहेत. जे हॉटेल चालक ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीनं कोट्यवधी हॉटेल ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय.
देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बिलासोबत सेवाशुल्क भरण्यास सांगितलं जात होतं. हे सेवाशुल्क चुकीचं ठरवण्यात आलं आहे. अशाप्रकारे शुल्क आकारणी करणं चुकीचं असून ग्राहकांवर सेवाशुल्काचा भार लादू नये, असे निर्देश आता जारी करण्यात आले आहेत.