अहमदाबाद: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. 182 जागांसाठी गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान झालं होतं. आज 37 मतदान केंद्रावर या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. सध्या गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. हिमाचल प्रदेशातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सत्ता राखणार की काँग्रेस बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फुले दांपत्यांबरोबरच छत्रपती शिवाज महाराजांचा अवमान
राज्यपालानंतर राज्यात आणखी चार जणांकडून छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
राज्यपाल कोश्यारी यांची आधी हकालपट्टी करा
माजी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात दिला इशारा
पुणे :
बाळासाहेब लांडगेंचा कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा
रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी काम पाहणार
शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थीनं तोडगा
Marathi News LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले मतदारांचे आभार
जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपने मेहनत घेतली
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप केवळ 1 टक्क्याने पिछाडीवर
आजच्या विजयातून पुढील काळाचे चित्र स्पष्ट होईल
परिवारवाद आणि भ्रष्टाचाराविरोधात देशात जनआक्रोश
पुढील 25 वर्षे केवळ विकासावरच निवडणूक लढविल्या जातील
Marathi News LIVE Update
भाजपच्या विजयाचा दिल्लीत जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या दिल्ली कार्यालयात
जे. पी. नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती
दिल्ली येथील भाजपच्या कार्यालयात विजयोत्सव
– पुणे जिल्ह्यात लम्पी आटोक्यात,
– राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात,
– जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६३३ जनावरे लम्पीमुळे मृत्युमुखी,
– तर सर्वाधिक मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार ५१० इतके झाले आहेत,
– जिल्हा परिषदेने केलेल्या तातडीच्या उपयायोजनांमुळे लम्पी आटोक्यात,
– जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
“थँक्यू गुजरात. जबरदस्त निवडणूक निकालाने माझ्या मनात अनेक भावना निर्माण झाल्या आहेत. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशिर्वाद दिलाय. त्याचवेळी हीच गती कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलीय. गुजरातच्या जनशक्तीला माझं नमन” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई :
मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाचा निकाल राखून ठेवला,
सीबीआयकडून देशमुखांच्या जामिनास विरोध
Marathi News LIVE Update
गुजरातमध्ये आणखी मेहनत करणार
पराभवानंतर राहुल गांधी यांचे ट्विट
गुजरातच्या जनतेचा कौल नम्रतापूर्वक स्विकारतो
भाजपने रेकॉर्डब्रेक केला, ऐतिहासिक विजय मिळवला
काँग्रेस सध्या 17 जगांवर विजय
Marathi News LIVE Update
भाजप-आपमध्ये साटंलोटं झाल्याची दाट शंका
संजय राऊत यांचा गंभीर आरोप
दिल्लीसाठी भाजप आणि आपमध्ये साटंलोटं झाल्याचा केला आरोप
2024 मधील निवडणुकांसाठी विरोधकांना एकत्र येण्याचं केलं आवाहन
Marathi News LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
संध्याकाळी दिल्ली भाजप कार्यालयात विजयोत्सव
मोदी संध्याकाळी भाजप कार्यालयात जाणार
गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय
सूरत शहरात भाजपाने 11 जागा जिंकल्या आहेत. लिम्बायत मतदारसंघात भाजपा उमदेवार 50 हजार मतांनी आघाडीवर आहे. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी 1 लाख 16 हजार मतांनी विजय मिळवला.
अमित शहा यांना महाविकास आघाडीचे पत्र
सीमा प्रश्न संदर्भात पत्रात उल्लेख
सीमा प्रश्न बाबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे
865 गावांमध्ये मराठी लोकांचं वास्तव्य आहे
या मराठी लोकांच संरक्षण करण्याची गरज
जामनगर उत्तरमधून रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा रवींद्र जाडेजा विजयी झाली आहेत. त्यांना 55,341 मते मिळाली.
विरामगाम विधानसभा मतदारसंघातून हार्दिक पटेल विजयी.
आपचे मुख्यमंत्रीच उमेदवार इसुदान गढवी यांचा पराभव
अरविंद केजरीवाल यांनी केला होता मोठा प्रचार
भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी पिछाडीवर
थोड्याच वेळात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल भूमिका मांडणार
भाजपचा प्रदेश कार्यालयात घेण्यात येणार आहे पत्रकार परिषद
भाजपचे इतर पदाधिकारीही राहणार उपस्थित
भरुचमधून भाजपा उमेदवार रमेश मिस्त्री विजयी.
अंकलेश्वरमधून भाजपा उमेदवार ईश्वर पटेल विजयी.
नवसारी येथे भाजपा उमेदवार राकेशभाई देसाई विजयी
साबरमतीमधून भाजपा उमेदवार हर्षद पटेल विजयी.
अहमदाबादच्या असरवा येथे भाजपा उमेदवार दर्शना वाघेला विजयी.
राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले नाही? यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.
गुजरात मध्ये धनशक्ती, सत्तेचा अमर्याद वापर झाला आहे. अशा प्रवृत्तीचा विरोध करायचा असेल तर लोकांमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस ते काम करतंय. निवडणूक निकालांवर पक्ष आत्मचिंतन करेलच, पण इतिहास भारत जोडो चं योग्य मुल्यांकन करेल.#GujratElection2022
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 8, 2022
हिमाचल प्रदेशमध्ये जे ताजे आकडे आहेत, त्यामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस सध्या 39 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 26 जागावर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी या शर्यतीत कुठेच नाहीय. त्यांच्या उमेदवारांच डिपॉझिट जप्त होऊ शकतं.
गुजरातमध्ये भाजपा 154 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस फक्त 17 जागांवर आघाडीवर आहे.
हिमाचल – काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला पाठवण्याची शक्यता, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार
हिमाचल प्रदेशात 11 पैकी 7 मंत्र्यांना विजयासाठी जंग जंग पछाडावं लागत आहे.
या सातही मंत्र्यांच्या मतदारसंघात काँटे की टक्कर सुरू आहे
दोन मंत्र्यांचे मतदारसंघ यापूर्वीच बदलण्यात आले होते, तरीही त्यांना विजयासाठी झटावं लागत आहे
शहर विकास मंत्री सुरेश भारद्वाज यांना शिमला मतदारसंघा ऐवजी कसुम्पटी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं
वनमंत्री राकेश पठानिया यांना कांगडा जिल्ह्यातील नुरपूर मतदारसंघा ऐवजी फतेहपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती.
हिमाचल प्रदेशात आतापर्यंत 45 ते 75 टक्के मंत्री निवडणुकीत पराभूत होण्याचा ट्रेंड राहिलेला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर 20 हजार मतांनी विजयी झाले आहेत. या राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटी-तटीचा सामना सुरु आहे. भाजपा 35 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 30 जागांवर पुढे आहे. आम आदमी पार्टीचा कुठलाही उमेदवार आघाडीवर नाहीय.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत आप 8 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय पक्षाचा टॅग मिळवण्यासाठी आपला 2 जागांवर विजय आणि 8 टक्के मतांची आवश्यकता आहे. दिल्ली, पंजाब आणि गोवामध्ये आपला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता आहे. आता गुजरातमुळे आपला राष्ट्रीय पक्ष बनण्यास मदत मिळणार आहे.
भाजपा नेते अल्पेश ठाकोर दक्षिण गुजरात गांधीनगरमधून आघाडीवर आहे. 3,270 मतांनी अल्पेश आघाडीवर आहे.
आतापर्यंत जे कल दिसतायत, त्यानुसार गुजरातमध्ये भाजपा मोठा विजय मिळवणार असं दिसतय. या रेकॉर्डब्रेक विजयाचं भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6.30 वाजता दिल्ली भाजपा मुख्यालयात जाणार असल्याची माहिती आहे. त्याआधी केंद्रीय मंत्री अमित शाह भाजपा कार्यालयात पोहोचतील. पीएम मोदी संध्याकाळी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
2002-2001 पासून गुजरात मॉडेल लोकांनी स्वीकारलय. आम्ही देशासमोर सादर केलेलं मॉडेल लोकांनी स्वीकारलय. मी लोकांना आणि गुजरात भाजपाला शुभेच्छा देतो. निवडणूक इतिहासातील हा एक मोठा विक्रम आहे – संसदीय कामकाज मंत्री
#GujaratElections | Gujarat model is being endorsed&accepted by people since 2000-2001. The model that we’re presenting before the nation is being accepted. I congratulate the people&BJP of Gujarat. It’s one of the biggest ever record in polling history: Parliamentary Affairs Min pic.twitter.com/aVOSZ66IOC
— ANI (@ANI) December 8, 2022
दांता सीट- लटूभाई पारघी- भाजप आघाडीवर
वडगाम सीट – मणिभाई वाघेला- भाजप आघाडीवर
वाव सीट – स्वरूप जी ठाकोर- भाजप आघाडीवर
थराद सीट – शंकरभाई चौधरी- भाजप आघाडीवर
धनेरा सीट – मावजी भाई चौधरी, अपक्ष आघाडीवर
कांकेरगे सीट – कीर्तिभाई वाघेला- भाजप आघाडीवर
पालनपूर सीट – अनिकेत ठाकर- भाजप आघाडीवर
दिशा- प्रवीणभाई माली- भाजप आघाडीवर
देवदार सीट – केसाजी चौहान- भाजप आघाडीवर
गुजरातचा निकाल अपेक्षित , हिमाचलमध्ये काँग्रेसची चांगली कामगिरी – संजय राऊत
राहुल गांधी हे वेगळ्या मिशनवर त्याचा गुजरात निकालाशी संबंध जोडू नका – संजय राऊत
शिवाजी महाराजांचा विषय मागे पडावा, म्हणून सीमावादाचा विषय पेटवलाय – संजय राऊत
कर्नाटकचे बोम्मई रोज महाराष्ट्राला कानाखाली मारतायत – संजय राऊत
जेलमध्ये टाकण्याचा धमक्या देता काय़ – संजय राऊत
कन्नड रक्षण वेदीकेने महाराष्ट्रात येऊन संजय राऊत यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिलीय, असं झालं तर तो महाराष्ट्रावर हल्ला – संजय राऊत
शिवरायांचा अपमान हा देशाचा अपमान, भाजपाने या बाबतीत देशाची माफी मागावी – संजय राऊत
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | गुजरातचा निकाल अपेक्षित , हिमाचलमध्ये काँग्रेसची चांगली कामगिरी – संजय राऊत
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | भूजमधून एमआयएमचा उमेदवार आघाडीवर
अल्पेश ठाकोर गांधीनगर दक्षिणमधून 3300 मतांनी पुढे
मणिनगरमध्ये भाजप उमेदवार 7303 मतांनी आघाडीवर
वडोदरा सिटी मतदारसंघातून भाजप उमेदवार मनिषा वकील चौथ्या फेरीनंतर आघाडीवर
अहमदाबाद असरवामध्ये दोन फेऱ्यानंतर भाजप उमेदवार 8 हजार मतांनी आघाडीवर
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | भाजपाला ५२ टक्के, काँग्रेसला २७ टक्के, आपला १४ टक्के मतदान #GujaratElectionResult #GujaratElection2022 #GujaratElections
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये झालेल्या एकूण मतांपैकी 50 टक्क्यांहून अधिक मतं भारतीय जनता पक्षाने मिळवली आहेत.
‘आप’ला एकूण मतांपैकी 14% वाटा मिळवण्यात यश आले आहे. काँग्रेसचा मतांचा वाटा 26.8% पर्यंत कमी झाला.
भाजप – 52.8%
काँग्रेस – 26.8%
आप – 14%
(ECI Figures)
हिमाचल प्रदेशात त्रिशंकूचे संकेत, अपक्षांच्या हाती सत्तेची चावी? भाजपा ३४, काँग्रेस ३१, अपक्ष ०३, आप ००
तीन अपक्षांवर असणार भाजपा आणि काँग्रेसची नजर
सरकार बनवण्यात ३ अपक्षांची भूमिका महत्त्वाची
हिमाचल प्रदेशात एकूण ६८ जागा
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया पिछाडीवर
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार गढवी पिछाडीवर
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा मुलगा महेंद्रसिंह वाघेला पिछाडीवर
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा मुलगा पिछाडीवर
महिसागरच्या तीन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीवर
कच्छच्या गांधीधाम मतदारसंघातून काँग्रेस 400 मतांनी आघाडीवर
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर गुजरातमध्ये भाजप आघाडीवर
जसदणमधून काँग्रेसचे भोला गोहिल आघाडीवर
अंजार विधानसभा मतदारसंघातून भाजप आघाडीवर
नवसारी आणि वासदामधून काँग्रेस आघाडीवर
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | गुजरातच्या बाबतीत अरविंद केजरीवाल यांचा ‘लिख लो चँलेन्ज’ यावेळी मात्र खोटा ठरणार
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | गुजरातमध्ये सकाळी ९ पर्यंत अजूनही आप फक्त ३ जागांवर आघाडीवर
गुजरात विधानसभा निकाल २०२२ | बडगाममधून काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी पुन्हा पिछाडीवर
भाजप 129 जगांवर आघाडीवर
काँग्रेस 43 जागांवर तर आप 3 जागांवर आघाडीवर
हार्दिक पटेल वीरगाममधून पिछाडीवर
गुजरातमध्ये 60 जागांवर भाजप आघाडीवर, तर 17 जागी काँग्रेसची आघाडी, मतमोजणीला सुरुवात
गुजरातमध्ये भाजप 7 जागांवर पुढे
काँग्रेसनेही खातं उघडलं
मतमोजणीला सुरुवात
गुजरात विधानसभा निवडणुकीत राजकोट पूर्व विधानसभा मतदारसंघाचा बोलबाला अधिक होता
या मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते इंद्रनील राजगुरू निवडणुकीच्या मैदानात आहेत
तर त्यांच्या विरोधात भाजपने उदय कानगड यांना उमेदवारी दिली आहे
आपने राहुल भुवा यांना मैदानात उभं केलं आहे
तर सीपीआयकडून सुरेश कुमार गोविंदभाई निवडणूक लढवत आहेत.
गेल्यावेळी इंद्रनील राजगुरु यांनी राजकोट पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती
गुजरातमध्ये एमआयएमच्या 13 उमेदवारांमुळे काँग्रेसला फटका बसणार? एमआयएम उमेदवारांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील कामगिरीकडे लक्ष, तर गुजरात निकालानंतर आप राष्ट्रीय पक्ष बनतो काय, यावरही देशाची नजर
आम्ही मोठ्या फरकाने या निवडणुकीत विजयी होऊ, असं भाजप नेते हार्दिक पटेल यांनी सांगितलं.
भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे
त्यामुळेच राज्यात भाजपची घरवापसी होणार हे निश्चित आहे
यावेळीही जनता आम्हालाच साथ देईल, असं हार्दिक पटेल यांनी सांगितलं
हार्दिक पटेल विरमगाम येथून निवडणूक लढत आहेत.
काँग्रेस आपल्या आमदारांना राजस्थानमध्ये नेणार
निवडणुकीनंतर होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी
गुजरातमध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत?
हिमाचल प्रदेशात निवडणुकीसाठी 10 हजार सुरक्षा रक्षक, निवडणूक अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत मतमोजणी होणार आहे
59 ठिकाणी तयार करण्यात आलेल्या 68 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार
सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटची मोजणी होईल
त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएममशीन उघडल्या जातील
हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबर रोजी मतदान झालं
हिमाचलमध्ये एकूण 76.44 मतदान झालं
निवडणूक आयोगाला 6 डिसेंबरपर्यंत टपालाने कमीत कमी 52,859 (जवळपास 87 टक्के) मते मिळाली
भाजपने 2002मध्ये गुजरातमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती
या निवडणुकीत भाजपने 182 जागांपैकी 127 जागा जिंकल्या होत्या
यंदाही भाजप चांगली कामगिरी करण्याचे संकेत आहेत
एक्झिटपोलच्या नुसार भाजपला यावेळी 117 ते 151 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
गुजरातच्या 182 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे
1621 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत.
एकूण 37 मतदान केंद्रांवर मतमोजणी होणरा आहे.
मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे
काऊंटिंग सेंटरपासून ते स्ट्राँग रुमपर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ठिकठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत
सकाळी 8 वाजता गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होणार
गुजरातच्या 32 जिल्ह्यातील 182 जागांसाठी मतमोजणी होणार