अहमदाबाद: गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री ( Gujrat CM Bhupendra Patel ) यांनी शपथ घेतल्यानंत लवकरच मंत्रिमंडळाची स्थापना होईल अशी शक्यता होती. मात्र, मंत्रिमंडळ ( Gujrat Cabinate ) विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांवरुन ( BJP New Face ) सरकारची गाडी अडली आहे. आणि नाराज आमदार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या ( Vijay Rupani ) घरी जमा झाले आहेत. मुख्यमंत्र्यांआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी ( Ministers Oath ) होणार होता, मात्र या पेचामुळे हा शपथविधी लांबणीवर टाकण्यात आला. कारण, नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या मूडमध्ये आहेत, ज्यावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळातून 90 टक्के जुन्या चेहऱ्यांना हटवलं जाईल आणि त्याजागी नवे चेहरे आणले जातील. ( Gujarat Chief Minister Oath ceremony, opportunity for new faces in the cabinet, old ministers have no place in the cabinet )
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी नाराज नेत्यांची रांग
गुजरात मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपच्या जुन्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी नाराज नेते दाखल होण्यात सुरुवात झाली आहे. या नाराज नेत्यांमध्ये ईश्वर पटेल, ईश्वर परमार, बचु खाबड, वासण आहीर, योगेश पटेल यांचा समावेश आहे. सध्या रुपाणींच्या घरी या नेत्यांची बैठक सुरु असल्याचं कळतं आहे.
पटेल मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान
नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आपल्या मंत्रिमंडळात नवे चेहरे घेण्यास उत्सुक आहेत. तब्बल 20 ते 22 मंत्री आज शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये बहुतांश नवे चेहरे आणि महिलांना स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्यामुळे गुजरात भाजपच्या जुन्या नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा मार्ग दाखवला जाऊ शकतो. याशिवाय जातिय समीकरण बसवून स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी देण्याचा विचार भूपेंद्र पटेल यांनी मांडल्याचं बोललं जात आहे. नितिन पटेल-चुडास्मा को एडजस्ट करना भी चुनौती
जुन्या भाजपच्या मंत्र्याचं काय होणार?
विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीपद नाकारलं जाऊ शकतं. यामध्ये भाजपचे दिग्गज नेते नितीन पटेल, भूपेंद्र सिंह चुडास्मा, आरसी फाल्दू आणि कौशिक पटेल यांचा समावेश असू शकतो. रुपाणी सरकारमध्ये नितीन पटेल हे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद सांभाळत होते. तर भूपेंद्रसिंह चुडास्मा हे शिक्षण मंत्री होते. आरसी फाल्दूंना कृषीमंत्री करण्यात आलं होतं, तर कौशिक पटेल यांना संसदीय कामकाज हे खातं देण्यात आलं होतं.
नितीन पटेल यांचा पत्ता साफ का होणार?
नितीन पटेल हे आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. आता मुख्यमंत्री पदावर भूपेंद्र पटेल हे विराजमान होत आहेत. हे दोघेही पाटीदार समाजातून येतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच समाजातील हे गणित भाजपच्या जोगी बसत नाही. त्यामुळेच उपमुख्यमंत्रीपदी किंवा अर्थमंत्रीपदी दुसऱ्या समाजातून येणाऱ्या नेत्याला भाजप संधी देऊ शकतं अशी शक्यता आहे.