अहमदाबाद : अहमदाबादच्या मोटेरा येथील आश्रमात एक महिला शिष्य सोबत दुष्कर्म केल्याप्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर सेशन कोर्टाने आसाराम बापू यांना ही शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये पीडित महिला शिष्याने आसाराम बापूच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आधी जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तर आसाराम बापूला दोषी ठरवण्यात आलं आहे. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
महिला शिष्यने 2001 मध्ये तिच्यावर आसाराम बापूकडून दुष्कर्म केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. या पीडित महिलेने एकूण 7 जणांविरोधात आरोप केले होते. त्यापैकी 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. कोर्टाने आसाराम बापूविरोधात 342, 357, 376, 377 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, आसाराम बापूने गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझी वक्ता म्हणून निवड केलं होती. त्यानंतर तिला फार्महाऊसमध्ये बोलवलं. आश्रमचा एक व्यक्ती तिला या ठिकाणी घेऊन आला. आसाराम बापूने यानंतर तिला खोलीत बोलवलं. एका वाटीत तूप घेण्यास सांगितलं. त्यानंतर डोक्याची मालीश करण्यासाठी सांगितले. यानंतर तिच्यासोबत दुष्कर्म करण्यास सुरुवात केली. मी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी समर्पण करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
आसाराम बापू सध्या आणखी एका दुष्कर्म प्रकरणात जोधपूर जेलमध्ये बंद आहे. कोर्टाने 16 वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मागील दहा वर्षापासून आसाराम बापू जेलमध्ये बंद आहे. अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला गेला. पण सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला. पण आता आसाराम बापू यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
आसाराम बापू हे अध्यात्मिक गुरु असल्याचा दावा करतात. त्यांचे भारतात लाखो अनुयायी आहेत. आसाराम बापू सत्संगच्या माध्यमातून लोकांना अध्यात्माबाबत मार्गदर्शन करत असत. याआधीही ते काही वेळा वादात सापडले होते. आसाराम बापू यांचे अनुयायी आजही त्यांच्या विरोधातील आरोप हे चुकीचे असल्याचं सांगतात.