पावसात 50 लाखांची ऑडी बुडली, कार मालकाची भावनिक पोस्ट, आता जगण्यासाठी राहिले काय?

| Updated on: Aug 29, 2024 | 6:01 PM

Gujarat floods: वडोदरात मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे आजवा धरणात पाणी वाढले. त्यामुळे धरणाचे पाणी विश्वामित्री नदीत सोडले गेले. त्यानंतर शहरात पाणी घुसले. वडोदरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लष्कराला बोलवण्यात आले.

पावसात 50 लाखांची ऑडी बुडली, कार मालकाची भावनिक पोस्ट, आता जगण्यासाठी राहिले काय?
गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यात बुडालेल्या गाड्या
Follow us on

गुजरातमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागांत महापूर आला आहे. या पुरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे. वडोदरामध्ये नदीला आलेल्या पुरामुळे पाणी शहरात घुसले. काही ठिकाणी घरांच्या छतावर मगरीसुद्धा चढल्या आहेत. दरम्यान, वडोदराहून एक व्यक्तीने भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्या व्यक्तीने लिहिले आहे की, मुसळधार पावसामुळे त्याच्या तीन गाड्या पाण्यात बुडाल्या. त्यानंतर अनेक जणांच्या कार पाण्यात गेल्या. त्या व्यक्तीने रेडीटवर पाण्यात बुडालेल्या त्याच्या तीन गाड्यांचे फोटो पोस्ट केले आहे. कॅप्शनमध्ये म्हटले की, आता जगण्यासाठी काहीच राहिले नाही…

फोटो केले शेअर

कार मालकाने पोस्टमध्ये त्याच्या तीन गाड्यांचे फोटो शेअर केले आहे. पाण्यात बुडलेल्या गाड्यांमध्ये मारुती सुझुकी सियाझ, फोर्ड इकोस्पोर्ट आणि ऑडी ए 6 यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे. तो व्यक्ती म्हणतो, त्याच्यासोबत असे तिसऱ्यांदा होत आहे. या परिस्थितीचा सामना करावा लागला. माझ्याकडे आता जगण्यासाठी काहीच राहिले नाही.

घरात आठ ते दहा फूट पाणी

वडोदरामधील त्या व्यक्तीच्या गाड्या बंगल्यात उभ्या होत्या. त्या रस्त्यावर नव्हत्या. परंतु घरात आठ ते दहा फूट पाणी भरले. वडोदरामधील सर्वात महगड्या भागात तो व्यक्ती राहतो. त्यांची सोसायटीत 85 बंगले आहेत. पाच 5 बीएचके असलेला त्यांचा बंगला आहे. त्यांच्या त्या घरात तीन पार्किंग आहेत.

हे सुद्धा वाचा

 

धरणाचे पाणी सोडल्याने शहरात पाणी

वडोदरात मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे आजवा धरणात पाणी वाढले. त्यामुळे धरणाचे पाणी विश्वामित्री नदीत सोडले गेले. त्यानंतर शहरात पाणी घुसले. वडोदरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लष्कराला बोलवण्यात आले. लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून लोकांना मदत पोहचवण्यात आली. विश्वामित्री नदीला आलेल्या पुरामुळे हजारो वाहने पाण्यात बुडाली.