अहमदाबादः गुजरातमधील खेडा (Kheda) जिल्ह्यातील लिंबासीमधील शाळेत (Limbasi School) दहावीतील विद्यार्थी विज्ञानाची परीक्षा देत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाल्याची घटना घडली. परीक्षा देत असताना त्याची अचानक तब्बेत बिघडली. त्यानंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचा मृत म्हणून घोषित केले गेले. गुजरातमधील मधील या वर्षातील ही तिसरी घटना आहे. परीक्षा देत असताना मागील वेळीही दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गुजरातीमधील खेडा जिल्ह्यातील लिंबासीमध्ये दहावीतील विद्यार्थी विज्ञानाची परीक्षा देत होता. .या विद्यार्थ्याचा सोमवारी सकाळी पेपर होता. अकरा वाजता पेपर देण्यासाठी तो सकाळी साडे दहा वाजता परीक्षा केंद्रावर पोहचला होता. परीक्षा देण्यासाठी तो जेव्हा परीक्षा केंद्रात गेला त्यावेळी विद्यार्थ्याच्या तब्बेतीत अचानक बिघाड झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या आरोग्याची तपासणी करुन झाल्यानंतर विद्यार्थ्याला मृत घोषित करण्यात आले. परीक्षा देत असताना मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव स्नेह भोई असे असून त्याचे मूळ गाव खेडा जिल्ह्यातील मातर आहे. आपल्या मातर गावाहून तो परीक्षा देण्यासाठी लिंबासीतील परीक्षा केंद्रावर आला होता. मात्र त्याचा मृत्यू झाल्याने शिक्षकांसह त्याच्या पालकांना धक्का बसला आहे.
दहावीची परीक्षा देणारा स्नेह भोई हा विद्यार्थी अपंग होता, परीक्षा देण्यासाठी तो जेव्हा 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहचला होता. मात्र परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्याची तब्बेत बिघडली होती. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. आरोग्य तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले गेले.
या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असताना दोन विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यामधील एक विद्यार्थी अहमदाबाद तर दुसरा विद्यार्थी हा नवसारीमधील होता. आता पुन्हा दहावीचा विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या
भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, तर मग त्यांना बिस्किटं टाका; पालिका अधिकाऱ्यांचा अजब सल्ला
ED Action On Sanjay Raut: फक्त राऊतच नाही तर ‘आप’ नेत्यावरही ईडीची वक्रदृष्टी, संपत्ती जप्त
IIT Kanpur : बापरे बाप! शंभर कोटींची गुरुदक्षिणा, कोण आहे देणगी देणारा कोट्यधीश विद्यार्थ्यी?