Gujrat Rain Alert : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर

| Updated on: Aug 26, 2024 | 7:13 PM

भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठकही घेतली आहे. यावेळी त्यांनी शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे.

Gujrat Rain Alert : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर
Follow us on

गुजरातमध्ये पावसामुळे स्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात IMD ने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सर्व प्राथमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे.

अहमदाबादमध्ये संततधार सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ज्यामुळे रस्ते बंद झालेत. पायाभूत सुविधांचे नुकसान झालेय. सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात शहरात 86 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे. त्यामुळे अहमदाबाद-वडोदरा इंटरसिटी एक्स्प्रेस, वडोदरा-अहमदाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस आणि वडोदरा-जामनगर इंटरसिटी एक्स्प्रेस या तीन गाड्या प्रभावित झाल्या आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश दिले आहेत. दक्षिण गुजरातमधील नर्मदा, वलसाड, तापी, नवसारी, सुरत आणि पंचमहाल या जिल्ह्य़ांमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील काही भागात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासात मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे. कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि अत्यंतमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.