सत्तासंघर्षाच्या सुनावणीत कळीचा मुद्दा कोणता? शिंदे गटाचे हरिश साळवे यांचा युक्तिवाद नेमका काय?

| Updated on: Feb 15, 2023 | 4:07 PM

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकिल हरिश साळवे यांनी युक्तिवाद करतांना पक्षांतर बंदी कायद्यावर भाष्य केलं आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत कळीचा मुद्दा कोणता? शिंदे गटाचे हरिश साळवे यांचा युक्तिवाद नेमका काय?
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिंदे गटाकडून हरिष साळवे ( ADV Harish Salave ) आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल ( Kapil Sibbal ) यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज ( 15 फेब्रुवारी ) हरिष साळवे यांनी कपिल सिब्बल यांच्या मुद्द्यावर आक्षेप घेत जोरदार युक्तिवाद केला आहे. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा मांडला आहे. बहुमत चाचणी होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा का दिला ? याशिवाय विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणलेला असतांना ते आमदारांना निलंबित कसे करू शकतात? असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

एकूणच कपिल सिब्बल यांनी सत्तासंघर्षाच्या सुनावणीत हरिश साळवे यांच्या युक्तिवादानंतर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत हरिष साळवे यांच्या मुद्दे खोडून काढले होते. त्यानंतर आज पुन्हा हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला आहे.

यामध्ये हरिश सावळे यांचा युक्तिवाद आजच्या दिवसातील सर्वात कळीचा मुद्दा राहीला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा का दिला ? अध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव असतांना अपात्रतेची कारवाई हे दोन मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामध्ये उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. यशीवे राजीनामा अवैध ठरविला तर ही चर्चा योग्य असेल याशिवाय उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठकच अर्थहीन असल्याचा युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ साळवे यांनी केला आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकिल हरिश साळवे यांनी युक्तिवाद करतांना पक्षांतर बंदी कायद्यावर भाष्य केलं आहे. पक्षांतर बंदी कायदा करूनही पक्षांतर थांबलेले नाहीत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असतांना रेबिया प्रकरणाचा दाखला योग्य नसेल तर विरोधी पक्षाला याचिका मागे घ्यावी लागेल असा युक्तिवादही साळवे यांनी करत विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवर भाष्य केलं आहे.

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर शिंदे गटाच्या आमदारांनी ईमेलद्वारे अविश्वास ठराव आणलेला असतांना तो पटलावर आलाच नाही असा संदर्भ देत उपाध्यक्ष त्यानंतरही काम करत राहिले असे म्हंटले आहे.

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव असतांनाही अपात्रतेची नोटिस दिली असता ती नियमाला धरून नाही असेही हरिश साळवे यांनी अधोरेखित केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत होती. पण नंतर वेळ असतांनाही ठाकरे यांनी राजीनामा दिला तो का दिला, त्यामुळे ठाकरे यांच्या कुठल्याच बैठकीला अर्थ उरत नाही असेही साळवे यांनी म्हंटलं आहे.

विधानसभेत 188 आमदार आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीकरे 173 आमदार होते. त्यात 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती त्यामुळे ते सरकार पडू शकत नव्हते. उद्धव ठाकरे यांना कल्पना आल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.

उद्धव ठाकरे आणखी 22 आमदारांना अपात्र ठरविण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी याचिका दाखल करण्याची तयारी सुद्धा केली होती. तो मुद्दा देखील हरिश साळवे यांनी अधोरेखित करत युक्तिवाद केला आहे.