नवी दिल्ली : हरियाणातील चरखी-दादरीमधून चक्रावून सोडणार एक प्रकरण समोर आलं आहे. इथे एका सामान्य मजुराच्या खात्यात 200 कोटी रुपये जमा झाले आहेत. खात्यात इतके पैसे कसे आले? ते आपल्याला सुद्धा माहित नाही, असं या मजुराने सांगितलं. अचानक खात्यात इतके पैसे आल्याने या मुजराच कुटुंब घाबरलं आहे. आपल्याला इतका पैसा नको. सरकारने हे पैसे ठेवून घ्यावेत व त्यांना योग्य वाटेल ते करावं. फक्त आपल्याला कुठला धोका नकोय, असं त्यांचं म्हणणं आहे. हे संपूर्ण प्रकरण बेरलाच आहे. या गावात राहणारा विक्रम आणि त्याचा चुलत भाऊ प्रदीप मजुरीचे काम करतात. दोघांनी गावकऱ्यांसमोर विक्रमच्या बँक खात्यात 200 कोटी रुपये जमा झाल्याचा दावा केला. पोलिसांनी विक्रमच्या घरी जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, असं नातलगांनी सांगितलं.
मुलाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्याच विक्रमची आई बीना देवी यांनी सांगितलं. ही रक्कम बँक खात्यात का जमा झाली? त्या बद्दल नातलगांना माहिती नाहीय. या सगळ्या प्रकरणात मोठा घोटाळा असू शकतो, असं विक्रमने सांगितलं. त्याने पीएम, सीएम, डीजीपीसह पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना टि्वट करुन ही माहिती दिली. ऑनलाइन एफआयआर नोंदवलाय. सध्या पोलिसांनी या प्रकरणात काही म्हटलेलं नाहीय. विक्रमच्या खात्यात ट्रॅन्जॅक्शन करणाऱ्याने 9 नंबरचा वापर केला.
कुठल्या कंपनीने खात उघडलं?
बेरला येथे राहणारा विक्रम मजुरी करुन आपल्या कुटुंबाच पालनपोषण करतोय. दोन महिन्यापूर्वी पटौदी येथे नोकरीसाठी गेला होता. तिथे त्याने एक्सप्रेस 20 नावाच्या कंपनीत मजुरीच काम केलं होतं. कंपनीने खात उघ़डण्यासाठी त्याचे डॉक्युमेंट घेतले होते. त्यानंतर खातं बंद करायचय सांगून त्याला नोकरीवरुन काढून टाकलं. विक्रमने या कंपनीत 17 दिवस नोकरी केली.