haryana election results: तोशाम विधानसभा जागेवर भाऊ-बहिणीत चुरशीची लढत, कोणी मारली बाजी?

| Updated on: Oct 08, 2024 | 6:24 PM

आज हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी सुरू आहे. काही जागांवर मतमोजणी पूर्ण झाली असून त्यापैकी एक तोशाम विधानसभा जागा आहे. या जागेवर भाऊ आणि बहीण यांच्यात लढत झाली. त्यामुळे ही जागा बरीच चर्चेत राहिली. बहीण भाजपकडून तर भाऊ काँग्रेसकडून रिंगणात होता. पण अखेर विजय कोणाचा झाला जाणून घ्या.

haryana election results: तोशाम विधानसभा जागेवर भाऊ-बहिणीत चुरशीची लढत, कोणी मारली बाजी?
Follow us on

हरियाणा निवडणुकीसाठीची मतमोजणी आज होत आहे. आतापर्यंत भाजपने राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा पैकी 50 जागांवर आघाडी घेतली आहे. या सर्व जागांवर 5 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत राज्यातील एक मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता. तो म्हणजे तोशाम विधानसभा मतदारसंघ. कारण या जागेवर चुलत भाऊ-बहीण यांच्यात चुरशीची लढत होती. बहीण आणि भाऊ दोघेही वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत होते.

भाऊ आणि बहिणीमध्ये कोणी मारली बाजी?

तोशाम विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. भाजपने श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसकडून अनिरुद्ध चौधरी रिंगणात होते. हे दोघेही चुलत भाऊ बहीण आहेत. त्यामुळे घरातच स्पर्धा रंगली होती, मात्र अखेर या जागेवर मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर बहिणीचा विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार श्रृती चौधरी यांनी भावाला पराभूत केले आहे. तोशाम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार श्रुती चौधरी यांना एकूण 76,414 मते मिळाली आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांचा 14,257 मतांनी पराभव केला.

तोशाम जागेचा निवडणूक इतिहास

तोशाम हा हरियाणाच्या विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. सर्वसामान्य कोट्यातून ही जागा यंदा आरक्षित होती. भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष होते. आता 2019 च्या निवडणूक निकालांबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेसचे किरण चौधरी यांनी 18,059 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. त्यांना 49.72% मतांसह 72,699 मते मिळाली होती. त्यांनी भाजपच्या शशी रंजन परमार यांचा पराभव केला होता. त्यांना 54,640 मते मिळाली होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकीतही किरण चौधरी या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 38.48% मतांसह 58,218 मते मिळाली. INLD उमेदवार कमला राणी यांना 38,477 मते (25.43%) मिळाली. किरण चौधरी यांनी कमला राणी यांचा 19,741 मतांनी पराभव केला.