nuh violence | ‘मुस्लिमांना कोणी टच करुन दाखवाव’, संरक्षणासाठी पुढे आला हा वर्ग

| Updated on: Aug 10, 2023 | 12:40 PM

nuh violence | याआधी काही पंचायतींनी आपल्या गावात मुस्लिमांच्या प्रवेशवार बंदी घातली होती. मुस्लिम समुदायाच्या लोकांना सातत्याने धमकी मिळत आहे. दोन्ही समाजांमध्ये प्रेम, विश्वासाच वातावरण रहाव, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलय.

nuh violence | मुस्लिमांना कोणी टच करुन दाखवाव, संरक्षणासाठी पुढे आला हा वर्ग
nuh violence
Follow us on

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात हरियाणातील नूंह आणि गुरुग्राम भागात दोन गटात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. जातीय तणाव निर्माण झाला होता. हरियाणामध्ये बुधवारी एक सम्मेलन झालं. त्यामध्ये खाप पंचायत आणि किसान संघाचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत मुस्लिम समुदायाच्या संरक्षणाचा निर्णय झाला. कोणालाही मुस्लिम समुदायाला टच करु देणार नाही, असं खाप आणि शेतकरी नेत्यांनी ठरवलं आहे. नूंह हिंसाचारानंतर ही पंचायत बसली होती.

राज्यात भडकलेल्या सांप्रदायकि हिंसेविरोधात सर्व नेते हिसार जिल्ह्यात एकवटले होते. किसान पंचायतीमध्ये हिंदू-मुस्लिम आणि शीखर सुमदायाचे जवळपास 2000 लोक सहभागी झाले होते.

मुस्लिम समुदायाला धमक्या

राज्यात नूंहमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या ज्वाळा गुरुग्रामपर्यंत पोहोचल्या. या हिंसेमुळे राज्यातील सर्व वातावरण बिघडलं. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या हिंसाचारामुळेच हे सकारात्मक पाऊल उचलण्यात आलय. याआधी काही पंचायतींनी आपल्या गावात मुस्लिमांच्या प्रवेशवार बंदी घातली होती. मुस्लिम समुदायाच्या लोकांना सातत्याने धमकी मिळत आहे. दोन्ही समाजांमध्ये प्रेम, विश्वासाच वातावरण रहाव, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलय.

‘मुस्लिमांना घुसू देणार नाही’

‘इथे मुस्लिम उभे आहेत. कोणी त्यांना टोकून दाखवावं’ असं खाप नेते सुरेश कोथ मंचावरुन म्हणाले. मुस्लिमांच संरक्षण ही खापची जबाबदारी आहे, असही ते म्हणाले. सुरेश कोथ यांनी शेतकरी आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती. “मुस्लिमांना घुसू देणार नाही, असं पंचायतींनी ठरवल्याच्या ज्या बातम्या येत आहेत, त्या खोट्या आणि चुकीच्या आहेत” असं कोथ म्हणाले.

शेतकऱ्यांनी काय शपथ घेतली?

बुधवारी झालेल्या या पंचायतीत शेतकऱ्यांनी शपथ घेतली की, ते कुठल्याही प्रकारच्या सांप्रदायिक हिंसाचार आणि जातीय मुद्यांमध्ये सहभागी होणार नाहीत. नूंहमध्ये शांता प्रस्थापित करण्याची सुद्धा शपथ घेतली आहे. नूंहमधील हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून अन्य लोकांना ज्यांनी भडकवलं, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पंचायतींनी केली आहे.