उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत 123 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 113 महिला 7 पुरुष आणि 3 मुले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. गुन्हा दाखल झाला आहे. परंतु हाथरस प्रकरणातील मुख्य चेहरा असलेल्या भोले बाबावर हा गुन्हा दाखल केला नाही. या बाबाच्या संपत्तीसंदर्भात मोठा दावा केला जात आहे. बाबांकडे शेकडो एकर जमीन आहे. बाबाचे आश्रम 5 स्टार आहे. त्यात फक्त बाबांसाठी सहा खोल्या बनवण्यात आल्या आहे. बाबा विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल झाल्याचे तपासातून समोर आले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, बाबा याच्या संपत्तीसंदर्भातील महत्वाची माहिती चौकशी दरम्यान मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरेमध्ये बाबाची 13 एकर जमीन आहे. त्याची किंमत चार कोटी रुपये आहे. या ठिकाणी बांधलेले आश्रमात अनेक खोल्या आहेत. त्यामध्ये 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. सूरज पाल (बाबाचे खरे नाव) या आश्रमात राहत होता. त्याच्यासाठी 6 खोल्या होत्या. तसचे कमेटीच्या अन्य सदस्यांसाठी 6 खोल्या होत्या. आश्रमासाठी खासगी रोडसुद्ध तयार करण्यात आला आहे. त्यात स्टेट ऑफ द आर्ट कॅफेटेरियासुद्ध आहे.
बाबा याच्या दाव्यानुसार, तीन-चार वर्षांपूर्वी एका भक्ताने ही जमीन भेट दिली. तपास संस्थांना बाबाकडे मिळालेल्या कागदपत्रांवरुन कोट्यवधीची संपत्ती असल्याचे पुरावे मिळाले आहे. ही संपत्ती देशातील विविध भागात आहे. अनेक राजकीय नेते, आयएएस आणि आयपीएस अधिकारी बाबाचे भक्त आहेत.
हाथरसमध्ये मंगळवारी भोले बाबाच्या सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात 123 जणांचा मृत्यू झाला. या कार्यक्रमास परवानगी देताना 80 हजार लोकांची दिली होती. परंतु कार्यक्रमासाठी 2.50 लाख लोक आले होते. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील बाबाचे भक्त कार्यक्रमास आले होते. ज्यावेळी बाबा परत जात होते तेव्हा त्यांच्या पायाखाली माती मिळवण्यासाठी गर्दीत चढाओढ सुरु झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.