ओमिक्रॉनमुळे (Omicron) देशभरात भीतीचं वातावरण निर्माण होईल असं आणखी एक वृत्त येऊन धडकलं आहे. कारण हाय रिस्क (High Risk Countries) देशातून आलेले 6 जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती केंद्र सरकारनं प्रसारीत केलीय. ह्या सर्वांची ओमिक्रॉन चाचणीही करण्यात आलीय. त्याच्या अहवालाची आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं कालच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या होत्या. नेमकं त्याच दिवशी परदेशातून आलेले 6 जण संक्रमित झाल्याचं निदर्शनास आलंय. महाराष्ट्रातही दोन दिवसांपुर्वी परदेशातून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यांच्याही ओमिक्रॉन अहवालाची वाट बघितली जातेय. ह्या सर्व घडामोडींमुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाची धाकधूक वाढली आहे.
काल म्हणजेच 1 डिसेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंत 11 आंतरराष्ट्रीय फ्लाईटस देशाच्या वेगवेगळ्या विमानतळावर लँड झाल्या. त्यात 3 हजार 476 प्रवाशी होते. सरकारच्या माहितीनुसार, ह्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर परीक्षण केलं गेलं. आणि त्यात 6 जण संक्रमित असल्याचं उघड झालं. ह्या सर्वांचं जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्वॅब घेण्यात आलेत आणि ते INSACOG च्या प्रयोगशाळेत पाठवलेत.
देशात 9 हजार नवे रुग्ण
देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत असं वाटत असतानाच 8 हजार 954 नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे देशभरातली कोविड रुग्णांची संख्या 3,45,96,776 इतकी झालीय. देशातली सक्रिय रुग्णांची संख्या 547 दिवसानंतर 1 लाखापेक्षा कमी झालीय. लेटेस्ट आकडेवारीनुसार देशात 267 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता 4, 69,247 इतकी झालीय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचं संकटानं तोंड उघडलंय. धोकादायक देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. त्या सर्वांचं आरटीपीसीआर केलं जाईल आणि पुन्हा 8 व्या दिवशी त्यांचं परिक्षण केलं जाईल.
Total 11 international flights landed at various airports of the country except Lucknow, from midnight to 4 pm today, from “at risk” countries. These carried 3476 passengers. All pax were administered RT-PCR tests, wherein only 6 pax were found #COVID19 positive: Govt of India pic.twitter.com/fUxVH0yscv
— ANI (@ANI) December 1, 2021
कोणत्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष?
आफ्रिका आणि यूरोपियन देशात ओमिक्रॉननं हात पाय पसरायला सुरुवात केलीय. त्यात धोकादायक देशांच्या लिस्टमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बोत्सवाना, चीन, मॉरीशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकॉंग आणि इस्त्रायल ह्या देशांचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) 26 नोव्हेंबरला ओमिक्रॉनला व्हेरीएंट ऑफ कंसर्न असं म्हटलंय. त्यामुळे अनेक देशांनी स्वत:च्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या. काहींनी अंशत: केल्या. काही देश तर असे आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरु करण्याचा प्लॅनही बासनात गुंडाळून ठेवला.
केंद्राच्या राज्यांना सुचना
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्याही बैठका होतायत. त्यात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ह्या बैठकीनंतर राज्यांना केंद्रानं दिलेल्या सुचना काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले गेलेत. एवढच नाही तर सर्व सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्याही सुचना केल्या गेल्यात.
हे सुद्धा वाचा:
धक्कादायक! फुलपाखरांच्या संख्येत घट, अन्नसाखळी येणार धोक्यात?
Jalgaon Accident : जळगावात क्रुझरचा भीषण अपघात, 3 जण जागीच ठार, 10 जखमी दोघे गंभीर