IMD Prediction : भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये दिवस उष्णता आणि रात्री थंडी पडताना दिसत आहे. पण अजूनही डिसेंबर महिन्यात हवी तशी थंडीची स्थिती पाहायला मिळत नाहीये. संध्याकाळनंतर आणि सकाळच्या आधी थंडी अजूनही मर्यादित आहे. पण दिवसा कडक सूर्यप्रकाश पडतोय. 2024 चा नोव्हेंबर महिना हा 1901 नंतर देशातील दुसरा सर्वात उष्ण नोव्हेंबर महिना ठरलाय. नोव्हेंबरमध्ये सरासरी कमाल तापमान 29.37 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मागच्या हंगाता 28.75 अंश तापमानाची नोंद झाली होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये हवामानाचे स्वरूप बदलेल अशी शक्यता आहे. थंडी आता सुरु होणार आहे. पण मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या लाट जास्त दिवस नसेल.
नोव्हेंबर २०२४ मध्ये देशातील अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा खूपच जास्त राहिले. लोकांना उष्णेतेचा सामना करावा लागला. पण आता थंडीची प्रतीक्षा अजून लांबली आहे. हवामान तज्ज्ञ यांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून उष्णता जाणवत आहे. डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडते. पण यंदा परिस्थिती काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
डिसेंबरमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पण यंदा कमी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
Monthly mean Temperature (average of daily minimum and maximum temperature) for the month of November over Northwest India is the highest during the year 2024 in the last 124 years (1901-2024). It is also the third highest over East-Northeast India and the entire country.… pic.twitter.com/iGXvLyE9M0
— India Meteorological Department (@Indiametdept) December 3, 2024
भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी माहिती दिली की, यावेळी थंडीची लाट कमी असेल. IMD च्या अंदाजानुसार, या वेळी थंडीच्या लाटेच्या दिवसांची संख्या नेहमीच्या पाच ते सहा दिवसांपेक्षा कमी असेल. IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, या मोसमात, दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील बहुतांश भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. जेथे कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.