उडपी : कर्नाटकमध्ये (Karnataka) हिजाबवरून सुरू झालेला वाद (Hijab Row) आता चांगलाच पेटला आहे. हिजाबच्या मुद्द्यावरून कर्नाटकमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पुढील तीन दिवस राज्यातील सर्वा शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहात आहोत, मी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतत ठेवावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. विद्यार्थांमध्ये वाद होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी असे आदेश देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच जे कोणी चिथावणीखोर वक्तव्य करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी देखील हिजाबच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, धार्मिक मुद्द्यावरून तणाव वाढणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. सरकार पोलीस बळाचा वापर करण्यास इच्छूक नाही, मात्र तशी वेळ प्रशासनावर आणू नका असा इशारा गृहमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. विद्यार्थांना आवाहन करताना गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपण सर्व विद्यार्थी आहात, सुक्षित आहात तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत आता कुठेतरी शाळेला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा बंद ठेवणे हिताचे ठरणार नाही. तसेच त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी शाळा ही काही एखादी धर्मसंस्था नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक विवाद होणार नाही याची काळजी घ्यावी.
कर्नाटकच्या उडपीमधून हा वाद सुरू झाला आहे. उडपीमधील एका शाळेत मुलींनी हिजाब घातला म्हणून त्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थीनींनी केला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थीनींनी हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणावरू कर्नाटकमध्ये तणावाचे वातावरण आहे. हिजाबच्या वादावरून राजकारण देखील तापले असून, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. विशेष: राज्याच्या शिवमोगा, बागलकोट आणि उडपीमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, उडपीमध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोक भाजपला जरूर निवडून देतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना विश्वास
ओबीसी आयोग आणि राज्य सरकारने आपली बाजू ठामपणे कोर्टात मांडावी- बावनकुळे