भाजपच्या तब्बल आठ मंत्र्यांचा पराभव, काँग्रेसची मोठी उसंडी, हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर निश्चित!

| Updated on: Dec 08, 2022 | 9:56 PM

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर आलाय. या निवडणुकीत काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारलीय.

भाजपच्या तब्बल आठ मंत्र्यांचा पराभव, काँग्रेसची मोठी उसंडी, हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर निश्चित!
Follow us on

शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल अखेर जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारलीय. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर आलाय. या निवडणुकीत काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारलीय. खरंतर काँग्रेसमध्ये उत्साह वाढवणारा हा निकाल आहे. काँग्रेसने या निवडणुकीत तब्बल 40 जागांवर विजय मिळवलाय. तर भाजपचे 25 आणि इतर तीन उमेदवारांना विजय मिळालाय. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जयराम ठाकुर सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आलीय.

हिमाचल विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मंत्र्यांमध्ये कसुम्प्टी विधानसभा मतदारसंघाचे सुरेश भारद्वाज, शाहपूरहून सरवीन चौधरी, फतेहपूर येथून राकेश पठानिया, कसौली येथून राजीव सैजल, मनाली येथून गोविंद सिंह ठाकुर, लाहौल स्पीति येथून रामलाल मारकंडा, कुटलैहड येथून वीरेंद्र सिंह कंवर आणि बिलासपूर येथून राजिंद गर्ग यांचा समावेश आहे.

हिमाचलमध्ये कोण होणार मुख्यमंत्री?

हे सुद्धा वाचा

हिमाचल प्रदेशचा निकाल पाहता काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित झालंय. पण मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत सर्व आमदार चर्चा करुन निर्णय घेणार, अशी माहिती समोर आली होती. हिमाचलचे दिवंगत मुख्यमंत्री विभद्र सिंह यांचा मुलगा आमदार विक्रमादित्य सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचं विधान केलंय.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आपली आई प्रतिभा सिंह यांनी घ्यावी यासाठी आपण शिमला ग्रामीण ही विधानसभेची जागा सोडायला तयार आहोत, असं विधान विक्रमादित्य सिंह यांनी केलंय. त्यामुळे प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पण याबाबत सध्यातरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

काँग्रेसचे सर्व आमदार शिमल्यात

दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना शिमला येथे बोलावलं आहे. कोणताही दगाफटका किंवा बंडखोरी होऊ नये म्हणून सर्व आमदारांना चंदिगढ येथे नेलं जाणार होतं. पण या सर्व आमदारांना आता शिमल्यातच राहू दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.