अर्थसंकल्पात ‘होम लोन’ची सूट वाढण्याची शक्यता, असा होणार फायदा

| Updated on: Jan 19, 2024 | 3:14 PM

Budget 2024 | सध्या होम लोनवर 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सूट दिली जाते. यामध्ये स्टँप शुल्क आणि नोंदणी शुल्क घेता येते. होमलोनच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्समध्ये सूट मिळते. परंतु तुम्ही घर भाड्याने दिले असेल तर तुम्हाला या सूटचा फायदा घेता येत नाही.

अर्थसंकल्पात होम लोनची सूट वाढण्याची शक्यता, असा होणार फायदा
Follow us on

नवी दिल्ली, दि.19 जानेवारी 2024 | देशात एकीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरु आहे. त्याचवेळी केंद्रीय अर्थमंत्रालयात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरु आहे. मोदी 2.0 सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी त्यातून अपेक्षा खूप आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यात मध्यमवर्गींसाठी महत्वाची तरतूद असण्याची शक्यता आहे. गृहकर्जातून सूट वाढण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. गृहकर्जाच्या निर्णयामुळे सामान्य मतदार आणि रिअल इस्टेट दोघांना बुस्ट मिळणार आहे.

क्रेडाईकडून केली गेली मागणी

कन्फेडरेशन ऑफ रिअल एस्टेट डेवलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) कडून होमलोन संदर्भात महत्वाची मागणी करण्यात आली आहे. सध्या होमलोनच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. ती वाढवून 5 लाख रुपये करण्याची मागणी क्रेडाईकडून करण्यात आली आहे. होम लोनवरील करातील सूटमध्ये वाढ होण्याची शक्यता यामुळे आहे. कारण गृहकर्जाचे व्याजदर वाढले आहेत. तसेच 2024 च्या दुसऱ्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत रेपो रेट कमी करणे सोपे नाही. रेपो रेट वाढल्याचा परिणाम होम लोन ईएमआयवर पडला आहे. यामुळे गृहकर्ज घेऊन घर घेणाऱ्यांचा ईएमआय वाढला आहे. त्यांना करातून सूट दिल्यास फायदा मिळू शकतो.

…तर फायदा घेता येत नाही

होम लोनवर 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सूट मिळते. यामध्ये स्टँप शुल्क आणि नोंदणी शुल्क घेता येते. होमलोनच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्समध्ये सूट मिळते. परंतु तुम्ही घर भाड्याने दिले असेल तर तुम्हाला या सूटचा फायदा घेता येत नाही.

हे सुद्धा वाचा

मिग्सन ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर यश मिगलानी म्हणात, कोरोनानंतर रिअर इस्टेट क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. विकसकांना चांगल्या घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्सहान दिले गेले पाहिजे. त्यासाठी करात सूट दिली पाहिजे. यामुळे बिल्डरसोबत घर घेणाऱ्यांना फायदा होईल. एमआरजी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर रजत गोयल यांना मागील वर्षाप्रमाणे या वर्षीय रियल एस्टेट सेक्टरमध्ये तेजी असण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा

दहा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट