हुबळी – कर्नाटकातील (Karnataka)तारीहाला औद्योगिक क्षेत्रात एका स्पार्कलर फॅक्टरीत लागलेल्या आगीत (fire in factory) चार जणांचा मृत्यू (four dead)झाल्याची माहिती आहे. फॅक्टरीत गॅस सिलिंडर फुटल्याने ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या दुर्घटनेत 8 मजूर जखमी झाल्याची माहिती होती, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक होती, त्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी ही आग लागली होती त्यानंतर जखमींना हुबळीच्या केआयएमएस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान, बचाव पथक आणि हुबळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून आग विझविण्याचे आणि बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
या दुर्घटनेत आठ मजूर होरपळले होते. त्यातील गडग जिल्ह्यातील विजयलक्ष्मी यांचा काल रात्री मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी गौरववा आणि मलेशा या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आहे. जखमी झालेले आठही जण गंभीर असल्यामुळे त्यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येते आहे.
बर्थडे कँडल्स बवनवणारी ही स्पार्कलर कंपनी होती. हुबळीच्या तरिहाला औद्योगिक क्षेत्रात ती १५ दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आली होती. ही फॅक्टरी अनधिकृत असल्याचे सांगण्यात येते आहे. या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात ८ मजूर जखमी झाले, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या फॅक्टरीचा मालक तब्सुम शेख फरार झाला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत असून फरार मालकाचा शोधही घेण्यात येतो आहे.