हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने कसे वापरले उत्तराखंड पॅटर्न?

| Updated on: Oct 08, 2024 | 4:42 PM

भारतीय जनता पक्षाने हरियाणामध्ये वापरलेला उत्तराखंड पॅटर्न यशस्वी झाला आहे. हरियाणामध्ये भाजपने जवळपास ५० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. हरियाणामध्ये एक्झिट पोल भाजपच्या विरोधात जात असताना भाजपने मात्र एकट्याने बहुमत मिळावल्याचं दिसत आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने कसे वापरले उत्तराखंड पॅटर्न?
Follow us on

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांने सर्वानाच धक्का बसला आहे. कारण एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण तसं घडलं नाही. भारतीय जनता पक्ष सर्व एक्झिट पोलमध्ये सत्तेबाहेर जाणार असल्याचे दाखवत होते, मात्र जनादेश पक्षाच्या बाजूने असल्याचे दिसले. निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाची आघाडी सातत्याने वाढत आहे. विधानसभेच्या 90 पैकी जवळपास 50 जागांवर भाजप आघाडीवर आहे. इंडिया अलायन्सला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी जवळपास 35 जागांवर पुढे आहे. इंडियन नॅशनल लोकदल-बसपा युती 2 आणि इतर तीन जागांवर आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हा विजय कसा खेचून आणला. त्यासाठी कोणती रणनिती आखली होती. हे आपण जाणून घेऊयात.

उत्तराखंडमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या 6 महिने आधी राज्याच्या नेतृत्वात बदल करण्यात आला होता. मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना हटवल्यानंतर पक्षाने पुष्कर सिंह धामी यांना संधी दिली. जे भाजपसाठी एक तरुण चेहरा होते. यानंतर पक्षाने 70 पैकी 47 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.

उत्तराखंडमधील वातावरण बदलले

2017 ते 2022 दरम्यान उत्तराखंडमध्ये तीन मुख्यमंत्री बदलण्यात आले. पहिले त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री केले. यानंतर तीरथ सिंह रावत मुख्यमंत्री बनले. जुलै 2021 मध्ये भाजपने त्यांना हटवले आणि पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री केले. 3 जुलै 2021 रोजी त्यांनी उत्तराखंडचे 10 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पक्षाने 45 वर्षीय तरुण चेहऱ्यावर विश्वास दाखवून वेगळी छाप पाडली आणि एका वेगळ्या नेतृत्वाचा प्रचार केला.

उत्तराखंडमध्ये 2021 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनाधार जात असल्याचं दिसत होते. सरकारविरोधात नाराजी दिसत असल्याने पुष्कर सिंह धामी यांनी अवघ्या सहा महिन्यांत आपल्या कामातून लोकांचा विश्वास जिंकला आणि पक्षाला 47 जागा मिळाल्या. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 46.5 टक्के मतांसह 57 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 33.5 टक्के मतांसह 11 जागा जिंकल्या होत्या.

जनाधार विरोधात जात असताना निर्णय

धामी यांच्यामुळे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत एंट्री इनकमबन्सी फॅक्टरनंतरही भाजपने 44.30 टक्के मते मिळवली आणि 47 जागा पटकावल्या. तर काँग्रेसने 37.9 टक्के मतांसह 19 जागा जिंकल्या. पक्षाची नेतृत्व बदलाची रणनीती येथे यशस्वी झाली. आता हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने उत्तराखंडप्रमाणेच रणनीती अवलंबली. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवण्यात आले. त्यांना केंद्रीय राजकारणात आणले. त्यांच्या जागी नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

12 मार्च 2024 रोजी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सैनी यांनी शपथ घेतली. 54 वर्षीय नायब सिंग सैनी हरियाणा सरकारमध्ये मंत्री आणि कुरुक्षेत्रचे खासदार राहिले आहेत. हरियाणा राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवण्यात आली. आपल्या रणनीतीने त्यांनी भाजपला राज्यात विजय मिळवून दिला. जिथे बदल निश्चित मानला जात होता. एक्झिट पोलमध्ये भाजपचा पराभव होईल असं सांगितलं जात होतं त्याच्या उलट येथे भाजपने विजय मिळवला आहे.

नायबसिंग सैनी यांनी पक्षाला मोठा विजय मिळवून दिला आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपने 33.20 टक्के मतांसह 47 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 36.49 टक्के मतांसह 40 जागा जिंकल्या. आता सैनी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 39.67 मतांच्या टक्केवारीसह 50 जागांवर आघाडी घेतली आहे.