नवी दिल्ली| 10 फेब्रुवारी 2024 : आम्ही जनप्रियता आणि सक्षमतेच्या समन्वयाचं प्रशिक्षण देतो. त्यामुळे सुशासनच्या प्रक्रियेला बळ मिळतं. जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही राजकारणात का आलात? तर तुमचं थेट उत्तर असेल जनतेच्या सेवेसाठी. पण प्रश्न हा आहे की जनतेच्या सेवेसाठी तुम्ही किती सक्षम आहात? तुम्ही जनतेची सेवा कशी कराल? त्यासाठी तुम्हाला मोटिव्हेशनल ट्रेनिंगची सर्वाधिक गरज आहे, असं प्रतिपादन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुशासन महोत्सवाचं आयोजन केलं आहे. त्यात प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घातला. जगातील अनेक देशात लोकशाहीची अनेक रुपे दिसतात. लोकशाहीत जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकता तेव्हा तुमची लोकप्रियता वाढते. पण मला आता दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवतेय. ते म्हणायचे, लोकशाहीत केवळ निवडून येणं महत्त्वाचं नाही. तर लोकशाहीत लोकप्रतिनिधींची सक्षमता महत्त्वाची आहे. समाजाच्या संपर्कात राहण्याची सक्षमता असली पाहिजे, असं विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले.
क्षमतेचा विकासात तीन प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे. पहिली म्हणजे मोटिव्हेशनल. मोटिव्हेशनल ट्रेनिंगने तुमच्यात कोणत्या प्रकारची क्षमता आहे, याचं तुम्हाला नेहमी भान राहतं. लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आहे. लोकांसमोर कसं उभं राहायचं? लोकांना कसं प्रभावित करायचं? याशिवाय दुसरं म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग. तुमच्या संकल्पना कशा अंमलात आणायच्या याचं आम्ही या अंतर्गत ट्रेनिंग देतो. त्यानंतर स्किल ट्रेनिंगचं काम होतं. याने तुमच्याताील मौलिक प्रतिभेचा विकास करण्याची संधी मिळते, अशी माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा सुशासनाचे उदाहरण मांडले आहेत. पंतप्रधानांनी सर्वात आधी नारा दिला होता. सबका साथ, सबका विकास. त्यानंतर त्यांनी त्यात सबका विश्वास हे जोडलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक शब्द जोडला. सबका प्रयास. सुशासनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या गरजा आणि सहभागही महत्त्वाचा मानला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढेही शब्द दिले. त्यामागे सुशासनाचा हेतू होता. दिव्यांग शब्द दिला. त्यांनी अमृतकाळ, विकसित भारत, आत्मनिर्भरता आदी शब्द दिले. मोदींनी लिंग भेदभावावरून देशाला संदेश दिला. मोदी म्हणाले होते की, घरी मुलगी उशिरा आली तर आईवडील विचारतात कुठे होतीस? पण कधी तुम्ही मुलालाही हा सवाल केलाय का?, असं सांगतानाच मोदींचा हा विचार देश आणि समाजाचं लोकशिक्षण करणारा आहे. लिंगभेद मिटवणारा हा संदेश आहे. त्यतात सुशासन आहे, असंही त्यांनी सांगितलं.