मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ( National Party ) निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. एकीकडे देशात आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनत असताना राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी दिला जातो. त्यासाठी निवडणूक आयोगाने काय निकष असतात. चला जाणून घेऊया.
१. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत.
२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत.
३. पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.
१. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा
२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 1 जागा मिळाली पाहिजे किंवा
३. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 3% जागा किंवा कमीत कमी 3 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा
४. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला राज्यातील 25 जागांमागे 1 जागा मिळाली पाहिजे किंवा
५. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 8% मते मिळाली पाहिजेत.
1) राखीव निवडणूक चिन्ह मिळते
2) पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन मिळते.
3) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण होते.
4) निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.
बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट),काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पक्ष