भारताचा असा पासपोर्ट ज्यात व्हिसा शिवाय कोणत्याही देशात एन्ट्री, विदेशात बनतात VVIP

| Updated on: May 13, 2024 | 3:45 PM

भारतात एकूण चार प्रकारचे पासपोर्ट असतात. पहिला ब्लू पासपोर्ट, दुसरा ऑरेंज पोसपोर्ट, तिसरा व्हाइट पासपोर्ट आणि चौथा डिप्लोमेटिक पासपोर्ट आहे. या चारही पासपोर्टचा रंग वेगवेगळा आहे. या पासपोर्टचा रंग वेगळा असण्यास विशेष कारण आहे.

भारताचा असा पासपोर्ट ज्यात व्हिसा शिवाय कोणत्याही देशात एन्ट्री, विदेशात बनतात VVIP
diplomatic passport
Follow us on

भारताचा पासपोर्ट नुकताच पुन्हा चर्चेत आला. जेडीएसचे माजी नेता आणि खासदार प्रज्जवल रेवन्ना यांच्यामुळे पासपोर्ट चर्चेत आला आहे. प्रज्जवल रेवन्ना याच्याकडे असलेल्या डिप्लोमेटीक पासपोर्टमुळे तो बंगळूरवरुन जर्मनीत फरार झाला. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तास दुजोरा दिला आहे. काय आहे हा डिप्लोमॅटीक पासपोर्ट? साधारण पासपोर्टपेक्षा तो किती वेगळा असतो? हा पासपोर्ट कोणाला मिळतो…

भारतात किती प्रकारचे पासपोर्ट

भारतात एकूण चार प्रकारचे पासपोर्ट असतात. पहिला ब्लू पासपोर्ट, दुसरा ऑरेंज पोसपोर्ट, तिसरा व्हाइट पासपोर्ट आणि चौथा डिप्लोमेटिक पासपोर्ट आहे. या चारही पासपोर्टचा रंग वेगवेगळा आहे. या पासपोर्टचा रंग वेगळा असण्यास विशेष कारण आहे. सामान्य भारतीय, सरकारी अधिकारी आणि मुत्सद्दी यांची ही ओळख आहे. इतर देशांतील सीमाशुल्क आणि पासपोर्ट तपासणारे अधिकारी यांना या रंगामुळे सहज ओळख होऊ शकते.

निळा पासपोर्ट

ब्लू पासपोर्ट हा सर्वात सामान्य पासपोर्ट आहे, जो सर्व सामान्य नागरिकांना दिला जातो. त्याचा रंग गडद निळा आहे. परराष्ट्र मंत्रालय सामान्य नागरिकांना वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी ब्लू पासपोर्ट जारी करते.

हे सुद्धा वाचा

ऑरेंज पासपोर्ट

केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या भारतीय नागरिकांना ऑरेंज पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट बहुतेक त्या भारतीयांना दिला जातो जे परदेशात स्थलांतरीत मजूर म्हणून काम करतात.

व्हाईट पासपोर्ट

भारत सरकार अधिकृत कामासाठी परदेशात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पांढरे पासपोर्ट दिला जातो. सीमाशुल्क तपासणीच्या वेळी त्यांना सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे वागणूक दिली जाते. पांढऱ्या पासपोर्टसाठी अर्जदाराला स्वतंत्र अर्ज सादर करावा लागतो. यामध्ये या पासपोर्टची गरज का आहे? हे त्याला स्पष्ट करावे लागते. हा पापोर्ट असणाऱ्यांना अनेक स्वतंत्र सुविधा मिळतात.

डिप्लोमॅटिक पासपोर्ट

उच्च प्रोफाइल सरकारी अधिकारी, मुत्सद्दी आणि सरकारी प्रतिनिधींना डिप्लोमॅटिक पासपोर्ट दिले जातात. लोकांच्या एकूण पाच श्रेणी जारी केल्या आहेत. प्रथम- राजनैतिक दर्जा असलेले लोक, दुसरे- अधिकृत कामासाठी परदेशात जाणारे भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, तिसरे- परराष्ट्र सेवेचे (IFS) A आणि B गट अधिकारी, चौथे- परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे जवळचे कुटुंब आणि IFS आणि पाचवे- सरकारला अधिकृत भेटी देणाऱ्या व्यक्ती (ज्यामध्ये केंद्रीय मंत्री, खासदार, राजकारणी असतात)

डिप्लोमॅटिक पासपोर्ट सर्वात शक्तिशाली का आहे?

डिप्लोमॅटिक पासपोर्ट हा भारतातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असल्याचे म्हटले जाते. ज्यांच्याकडे हा पासपोर्ट आहे त्यांना बहुतेक देशांमध्ये व्हिसाची आवश्यकता नसते. व्हिसा आवश्यक असला तरी सामान्य पासपोर्टधारकांच्या तुलनेत व्हिसा लवकर आणि प्राधान्याने मिळतो. डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना सुरक्षेमधूनही सूट देण्यात आली आहे.