हैदराबाद : किडनीमध्ये असलेला लहान आकाराचा एखादा मुतखडाही तुम्हाला जेरीस आणू शकतो. मुतखड्याचा आकार आणि संख्या जितकी जास्त, तितका त्रास जास्त. मात्र हैदराबादमधील (Hyderabad) एका बड्या रुग्णालयात डोळे विस्फारणारा प्रकार समोर आला आहे. 50 वर्षीय रुग्णाच्या मूत्रपिंडातून विक्रमी 156 किडनी स्टोन (kidney stones) बाहेर काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मोठ्या शस्त्रक्रियेऐवजी लेप्रोस्कोपी (laparoscopy) आणि एंडोस्कोपी (endoscopy) पद्धतीने मूतखडे बाहेर काढले.
तीन तास शस्त्रक्रिया
लेप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी वापरुन एकाच रुग्णाच्या मूत्राशयातून बाहेर काढण्यात आलेली मूतखड्यांची ही देशातील विक्रमी सर्वाधिक संख्या आहे. ही शस्त्रक्रिया जवळपास तीन तास चालली होती. प्रिती युरॉलॉजी अँड किडनी हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी झाली. संबंधित रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याची दैनंदिन कामंही सुरु झाली आहेत.
मूतखड्यांची शस्त्रक्रिया झालेला रुग्ण हा व्यवसायाने शिक्षक आहे. त्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं होतं. तपासणी केली असता त्याच्या मूत्रपिंडात अनेक किडनी स्टोन्स दिसले.
आव्हान काय होतं
विशेष म्हणजे मूत्रमार्गाऐवजी त्याच्या पोटाजवळ हे स्टोन्स होते. किडनी अन्यत्र असणे ही समस्या नव्हती, मात्र असामान्य स्थितीत असलेल्या किडनीतील मूतखडे काढून टाकणे हे आव्हानात्मक काम होते, असे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णाच्या पोटात कदाचित दोन वर्षांपासून मूतखडे तयार होत असावेत, मात्र त्याला कुठलीही लक्षणं दिसली नसावीत. मात्र अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यामुळे त्याला चाचण्या कराव्या लागल्या. ज्यामध्ये अनेक किडनी स्टोन्सचे निदान झाले. त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेऐवजी लेप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला, असं डॉ. चंद्रमोहन यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
बोगस प्रमाणपत्र देणारे आणखी एक रॅकेट औरंगाबादेत उघड, ओम्नी व्हॅनमध्ये फसवेगिरीचा कारखाना!
क्रूरतेचा कळस! चाळीस वेळा चावला, नवऱ्यानंच अंकिताचा जीव घेतला
लहानग्या रुद्रला दुर्धर आजार, उपचाराच्या निधीसाठी ‘हासिल ए महफिल’ चे आयोजन