कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉलिवूड कलाकारांनी राजकारणाच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. आता या यादीत बंगाली अभिनेते यश दासगुप्ता यांचं नाव जोडलं गेलं आहे. दासगुप्ता हे तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. पण दासगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे नुसरतही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चा नुसरत यांनी फेटाळून लावल्या आहेत. माझी बांधिलकी तृणमूलशी आहे. मी तृणमूलची लॉयल सैनिक आहे, असं नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं आहे. (I am a loyal soldier of Trinamool: TMC MP Nusrat Jahan on Yash Dasgupta joining BJP)
यश दासगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नुसरत जहाँ यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका व्यक्त केली. मी तृणमूलची लॉयल सैनिक आहे. मी तृणमूलमध्येच राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यश दासगुप्ता यांनी बुधवारी चाहत्यांच्या प्रचंड उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दासगुप्ता हे भाजपमध्ये आल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 2021मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे बॉलिवूड आणि बंगाल सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या तृणमूलकडे वाढत्या ओढ्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डेटिंगच्या चर्चा
मध्यंतरीच्या काळात दासगुप्ता आणि नुसरत जहाँ एकत्र राजस्थानच्या ट्रीपवर गेले होते. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगच्या अफवा जोरात पसरल्या होत्या. नुसरत यांनी 2019मध्ये निखील जैन या उद्योजकाशी चर्चा केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संबंधामध्ये वितुष्ट आलं असल्याची चर्चा आहे. परंतु त्याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. गेल्याच आठवड्यात यश दासगुप्ता यांनी त्यांचा भाजप प्रवेश ही मोठी गोष्ट नाही असं सांगतानाच तसेच आपलं नाव ज्यांच्याशी जोडलं जातयं त्या तृणमूलसाठी प्रचार करत असल्याचं म्हटलं होतं.
ट्विकल-अक्षयने लग्न केलंय
तुम्ही चांगले मित्र असतानाही तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला? असा सवाल दासगुप्ता यांना विचारण्यात आला. त्यावर असं का होऊ शकत नाही? घरातील लोकांचीही राजकीय आणि इतर विषयांवर मतभिन्नता असतेच ना, असंही त्यांनी सांगितलं. अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना सारखं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर अक्षय आणि ट्विंकलचं लग्न झालेलं आहे. नुसरत आणि माझं नाही. त्यामुळे आमची विचारधारा वेगवेगळी असेल तर काही फरक पडत नाही. आता तुम्ही त्याचा काहीही अर्थ काढू शकता, असंही ते म्हणाले. (I am a loyal soldier of Trinamool: TMC MP Nusrat Jahan on Yash Dasgupta joining BJP)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 19 February 2021 https://t.co/lslIbtnGsV
| #Maharashtra | #Mumbai | #MarathiNews | #ShivJayanti | #Politics |
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
संबंधित बातम्या:
दिशा रवीसाठी ग्रेटा थनबर्ग मैदानात; ट्विट करून मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून टीका
सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी गडकरींची मोठी घोषणा, वाचा काय आहे सूचना !
(I am a loyal soldier of Trinamool: TMC MP Nusrat Jahan on Yash Dasgupta joining BJP)