रात्रंदिवस शिव्या मिळाल्यावर कसे वाटते…मुलांच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी असे दिले उत्तर

| Updated on: Jan 10, 2025 | 3:16 PM

PM Modi Podcast: गुजरातचा मुख्यमंत्री बनल्यावर मी निश्चित केले की मेहनतमध्ये काही कमी करणार नाही. मी स्वत:साठी काहीच करणार नाही. मी चुकीचे काही करणार नाही. या गोष्टींना मी जीवनाचा मंत्र केला. मी मानव आहे. देवता नाही, परंतु मी रंग बदलणारा व्यक्ती नाही.

रात्रंदिवस शिव्या मिळाल्यावर कसे वाटते...मुलांच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी असे दिले उत्तर
PM Modi Podcast
Follow us on

PM Modi Podcast: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांचे पहिले पॉडकास्ट शुक्रवारी जारी केले गेले आहे. हे पॉडकास्ट झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले. तसेच मुलांचे प्रश्न आणि सार्वजनिक जीवनातील आव्हानांवर मोकळेपणाने चर्चा केली.

पॉडकास्ट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मनोरंजक किस्सा सांगितला. जेव्हा मुलांनी त्यांना विचारले की टीव्हीवर स्वतःला पाहून कसे वाटते. काही मुलांनी रात्रंदिवस तुम्हाला शिव्या मिळतात, तेव्हा तुम्हाला कसे वाटते असे विचारले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अहमदाबादी जोक सांगितला.

अहमदाबादी किस्सा असा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एक अहमदाबादी व्यक्ती त्यांच्या स्कूटरवरून जात होता. वाटेत त्याची कोणाशी तरी टक्कर झाली. त्याची काही चूक नव्हती. परंतु समोरच्या व्यक्तीने रागाने त्याला शिवीगाळ सुरू केली. परंतु तो अहमदाबादी व्यक्ती तसाच उभा राहिला. त्याने त्या शिवीगाळला काहीच उत्तर दिले नाही. लोकांनी त्याला विचारले, तेव्हा तो म्हणाला, ‘तो फक्त शिव्या देत आहे, त्याला काही घेऊन तर जात नाही ना.’ ही गोष्ट स्वतःशी सांगताना पीएम मोदी म्हणाले की, शिवीगाळ करणे ही लोकांची निवड आहे, परंतु प्रत्यक्षात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की व्यक्तीने सत्याच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि त्याच्या हृदयात कोणतेही पाप नसावे.

हे सुद्धा वाचा

संवेदनशील असणे गरजेचे…

सार्वजनिक जीवनातील आव्हानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कार्यालय असो की राजकारण अनेक ठिकाणी आपल्यात वाद असतात. परंतु त्याचा अर्थ असा नाही की व्यक्तीने गेंड्याच्या कातडीचा असले पाहिजे. सार्वजनिक जीवनात संवेदनशीलता खूप गरजेची आहे. संवेदनशील नसला तर इतरांचे कल्याण करु शकणार नाही.

प्रधानमंत्री म्हणाले, गुजरातचा मुख्यमंत्री बनल्यावर मी निश्चित केले की मेहनतमध्ये काही कमी करणार नाही. मी स्वत:साठी काहीच करणार नाही. मी चुकीचे काही करणार नाही. या गोष्टींना मी जीवनाचा मंत्र केला. मी मानव आहे. देवता नाही, परंतु मी रंग बदलणारा व्यक्ती नाही. तुम्ही कधी चुकीचे केले नाही तर तुमच्यासोबत काही चुकीचे होणार नाही.