भोपाळ : भारतात दोन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात आता लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. देशात सर्वात आधी कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लस टोचली जाणार आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणात लस टोचणार नाही, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे (Shivraj Singh Chauhan on Corona Vaccine).
“मी आता लगेच कोरोनाची लस टोचणार नाही, असा मी निर्णय घेतला आहे. आधी इतरल लोकांना लस दिली जावी. त्यानंतर मी लस घेईन. कोरोना लसीची ज्यांना जास्त आवशकता आहे, अशाच लोकांना सर्वात आधी लस दिली जावी”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे (Shivraj Singh Chauhan on Corona Vaccine).
#WATCH …I have decided that I will not get vaccinated for now, first it should be administered to others. My turn should come afterwards, we have to work to ensure that priority groups are administered with the vaccine: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan pic.twitter.com/EGbkb70iz2
— ANI (@ANI) January 4, 2021
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी
भारताच्या औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला आणि झायडस कॅडिला या लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या दोन्ही व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकणार आहे. तसेच रुग्णाला दोन्ही इंजेक्शनचे दोन-दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम होणार असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.
5 कोटी डोस तयार
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनिकाच्या कोव्हिशिल्डच्या उत्पादनाचं काम सीरम इन्स्टिट्यूटला मिळेलालं आहे. सीरमच्या दाव्यानुसार कोरोनाच्या नव्या संसर्गावरही ही व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. कोरोना संसर्गात फारसा बदल झालेला नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळेच ही व्हॅक्सिन अधिक परिणामककारक ठरण्याची शक्यता आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी यापूर्वीच या व्हॅक्सिनचे 5 कोटी डोस तयार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस टोचली जाण्याची शक्यता आहे.
लसीची किंमत?
सीरमने खासगी कंपन्यासाठी या लसीची किंमत प्रति डोस एक हजार रुपये ठेवली आहे. तर भारत सरकारला 200 रुपयात एक डोस देण्यात येणार आहे. म्हणजे या व्हॅक्सिनच्या दोन डोसची किंमत 400 रुपये असणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. शिवाय देशातील गोरगरीबांनाही ही लस मोफत मिळावी म्हणून केंद्राकडून लवकरच काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : Varsha Raut | वर्षा राऊत एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर