मुंबई: दरवर्षी अनेक भारतीय विद्यार्थी आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी परदेशात जातात हे खरं आहे. पण त्यांनी आपलं मूळ विसरू नये हे महत्त्वाचं आहे. भारतीय जवळजवळ प्रत्येक देशात आहेत आणि जेव्हा जेव्हा अभिमानाने देशाबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा ते पुढे येतात आणि मनापासून बोलतात. एका भारतीय विद्यार्थ्याने नुकताच परदेशी भूमीवर आपल्या पदवीप्रदान समारंभात भारतीय ध्वज फडकवला, ज्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे आणि तो पाहून लोकांना खूप अभिमान वाटत आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे तो आणखी खास बनला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी अवनीश शरण यांनी 11 ऑगस्ट रोजी हे ट्विट केले होते. ‘त्याने पदवी मिळवली आणि लाखो लोकांची मने जिंकली,’ असे ट्विट करण्यात आले. रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये एक अनोळखी विद्यार्थी परदेशी विद्यापीठातील प्राध्यापकांकडून पदवी घेण्यासाठी स्टेजकडे जात असल्याचे दिसत आहे. भगवा कुर्ता आणि धोतर परिधान केलेला हा तरुण भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसला. हात जोडून त्यांनी आपल्या प्राध्यापकांना ‘नमस्ते’ केले.
He got a degree and won millions heart.❤️ pic.twitter.com/sX25GC9pZI
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) August 11, 2023
प्रेक्षागृहात बसलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर खिशातून भारतीय ध्वज काढून त्याने तो अभिमानाने फडकविला. परदेशी भूमीवर शैक्षणिक यश मिळवल्यानंतर मुलाचा आनंद दिसत होता. या मनमोहक व्हिडिओने ट्विटर युजर्सला खूप प्रभावित केले. ते मुलाच्या देशप्रेमाचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओने लाखो लोकांची मने जिंकली.