IAS Success Story : IAS किंवा IPS अधिकारी होणे ही लाखो जणांचे स्वप्न असते. पण काही मोजक्या लोकांचीच स्वप्न पूर्ण होतात. यासाठी लागते ती जिद्द आणि चिकाटी. या बळावरच अनेकांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. 1973 साली UPSC परीक्षा ज्यांना पास करता आली पण मुलीने मात्र दोन वेळा या परीक्षेत बाजी मारली. तिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण तर केलेच पण अनेकांसाठी प्ररेणा देणारी ठरली. ती आधी IPS झाली आणि नंतर IAS अधिकारी बनली.
UPSC नागरी सेवा परीक्षेला दरवर्षी लाखो मुले परीक्षेला बसतात. परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS किंवा IPS अधिकारी होणं यासाठी मोठी स्पर्धा असते. काही लोकं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतक्या चिकाटीने अभ्यास करतात की यश मिळतंच. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस अधिकारी बद्दल सांगणार आहोत.
IAS अधिकारी असलेल्या मुद्रा गायरोला या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागच्या रहिवाशी आहेत. आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला लहानपणापासूनच अभ्यासात अव्वल होत्या. 10वीच्या परीक्षेत 96% आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत 97% गुण मिळवले होते. त्यामुळे भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते देखील त्यांचा सन्मान झाला होता.
आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला नंतर मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कोर्समध्ये प्रवेश घेतला. बीडीएसमध्ये ही त्यांनी सुवर्णपदक मिळवले. ग्रॅज्युएशननंतर त्या दिल्लीला गेल्या. आयएएस अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
मुद्रा गायरोलाच्या वडिलांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. पण ते पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्रा गायरोला यांनी एमडीएस अर्धवट सोडले आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली. मुलाखती पर्यंत पोहोचल्या पंरतू निवड होऊ शकली नाही.
मुद्रा गायरोला यांनी पुन्हा एकदा 2019 मध्ये UPSC दिली. पण तेव्हा देखील नाव अंतिम गुणवत्ता यादीत आले नाही. यानंतर मुद्राने २०२१ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी तिच्या मेहनतीचे फळ मिळाले. तिने 165 वा क्रमांक मिळवला. ती IPS अधिकारी बनली. पण तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते. मुद्राने 2022 मध्ये पुन्हा यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली आणि यावेळी ती 53 व्या रँकसह यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनली. ही बातमी तुम्हाला कशी वाटली. कमेंटमध्ये नक्की कळवा.