IC 814 Hijack : कंदहार विमान अपहरण प्रकरणात चूक कोणाची? माजी RAW चीफ स्पष्टपणे बोलले

| Updated on: Sep 04, 2024 | 11:12 AM

IC 814 Hijack : ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ वेबसीरीजमुळे 25 वर्षापूर्वीची विमान अपहरणाची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी रॉ प्रमुखांनी यावर भाष्य केलं आहे. त्यावेळी काय परिस्थिती होती? काय करायला पाहिजे होतं? यावर रॉ प्रमुख बोलले आहेत. परकीय शत्रूपासून देशाच संरक्षण करणं, त्यांच्या कारस्थानांची माहिती मिळवणं, ही रॉ ची जबाबदारी आहे.

IC 814 Hijack : कंदहार विमान अपहरण प्रकरणात चूक कोणाची? माजी RAW चीफ स्पष्टपणे बोलले
, ic 814 kandahar highjacking
Follow us on

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ या वेबसीरीजमुळे 25 वर्षापूर्वीची विमान अपहरणाची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूवरुन दिल्लीला येण्यासाठी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केलं. पण हवेत असतानाच हे विमान हायजॅक करण्यात आलं होतं. या वेबसीरीजमुळे अनेक मुद्यांवर पुन्हा एकदा वादविवाद सुरु झाला आहे. तत्कालीन सरकारने ती परिस्थिती कशी हाताळली? वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा त्यात सहभाग असे अनेक मुद्दे आहेत. 1999 साली IC 814 विमानाच अपहरण झालं. त्यावेळी एएस दुलत ‘रॉ’ चे प्रमुख होते. ‘रॉ’ म्हणजे रिसर्च अँड एनलिसिस विंग. रॉ कडे देशाच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी असते.

परकीय शत्रूपासून देशाच संरक्षण करणं, त्यांच्या कारस्थानांची माहिती मिळवणं, ही रॉ ची जबाबदारी आहे. एएस दुलत विमान अपहरणाच्या विषयावर बोलले आहेत. ‘निर्णय घेण्याची वेळ आली, त्यावेळी सगळी गडबड झाली’ असं माजी रॉ प्रमुख एएस दुलत यांनी मान्य केलय. ते इंडिया टुडे टीव्हीशी बोलत होते. “अमृतसरमध्ये विमान उतरल्यानंतर ते भारताच्या हद्दीबाहेर जाणार नाही हे सुनिश्चित करण्याची आम्हाला संधी मिळाली होती. पण विमान अमृतरसरमधून उडाल्यानंतर डील करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. चर्चेतून जे उत्तम करणं शक्य होतं, ते आम्ही केलं” असं दुलत म्हणाले.

‘दुसऱ्या कुणाइतका मी सुद्धा जबाबदार’

“कुठलाही निर्णय घेतला नाही. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आणि त्यानंतर सुद्धा मी यावर अनेकवेळा बोललोय. अमृतसरमध्ये गडबड, गोंधळाची स्थिती होती” असं दुलत म्हणाले. अपहरण झालेलं IC 814 अमृतसरमध्ये इंधन भरण्यासाठी उतरलेलं. 50 मिनिट हे विमान भारतीय भूमीवर होतं. केंद्रीय सुरक्षा एजन्सी आणि पंजाब पोलिसांना या स्थितीचा फायदा उचलता आला नाही. “आम्ही सर्व तिथे होतो. निर्णय घ्यायला पाहिजे होता. मला कोणाच नाव घ्यायच नाहीय. इतक्या वर्षांनी ते योग्य ठरणार नाही. दुसऱ्या कुणाइतका मी सुद्धा जबाबदार आहे” असं दुलत म्हणाले.