सुपौल : मानवतेला काळिमा फासणारी एक क्रूर घटना बिहारमध्ये घडली आहे. एका गर्भवती महिलेला तिच्या मुलासह जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सुपौल येथे समोर आली आहे. केवळ एक लाख रुपयांसाठी महिलेचा पती आणि नणंदेने हे कृत्य केल्याचे कळते. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली असून पोलीसही चक्रावून गेले आहेत. घटनेनंतर आरोपी पती आणि नणंद फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सुपौलच्या त्रिवेणीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मयुरवा वार्ड-4 मध्ये सदर कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी पतीला रेल्वेमध्ये ग्रुप डी मध्ये नोकरी लागली होती. यासाठी त्याला एक लाख रुपये भरायचे होते. त्यामुळे तो पत्नीला माहेरुन एक लाख रुपये आणण्यास सांगत होता. मात्र पत्नीने माहेरुन पैसे आणण्यास नकार दिला. यामुळे दोघा पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत होती. याच भांडणातून पतीने पत्नी आणि मुलाचा काटा काढला. या हत्याकांडात त्याच्या बहिणीनेही त्याला साथ दिली.
आरोपीने बहिणीच्या मदतीने आधी पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली. मग दोघांनाही बेडला बांधले, त्यानंतर बेडसह दोघांना जिवंत काढले आणि दोघे भाऊ बहिण फरार झाले. या आगीत आई आणि मुलासोबत महिलेच्या पोटातील बाळही जिंवत जळाले. शेजाऱ्यांनी घरात आग लागल्याचे पाहिल्यानंतर स्थामिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घरात जाऊन पाहिले असता आतलं चित्र बघून त्यांनाही धक्का बसला.
रंजन देवी (27) आणि त्यांचा मुलगा आशिष रंजन (3) अशी मयत आई व मुलाचे नाव आहे. मृताच्या नातेवाईकांनी पती आणि त्याच्या बहिणीवर खुनाचा आरोप केला आहे. मृत महिलेच्या पतीने व नणंदेने आई-मुलाला बेडवर बांधून जिवंत जाळल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पती आणि नणंदेने दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना बेडवर बांधल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला जिवंत जाळण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेच्या आरोपी पतीने त्याच्या नोकरीसाठी पत्नीला आपल्या माहेरुन एक लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. रंजन देवी यांनी माहेरी पैसे मागण्यास नकार दिला. यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. याच कारणावरून त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. (In Bihar, a pregnant wife and child were burnt alive by their husbands)
इतर बातम्या
पिकअप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळली, दोन चिमुरड्यांसह महिलेचा मृत्यू