कुणाचे वडील गेले तर कुणाचा मुलगा, एकमेकांना धीर देत होते, पण तिने जे केलं ते पाहून…

| Updated on: May 13, 2023 | 1:42 PM

शहीद झालेल्या पोलिसांपैकी पाच जण पूर्वी नक्षलवादी होते. पण, नक्षलवाद सोडून आत्मसमर्पण करत हे पाच जण पोलिस दलात सामील झाले होते. शहीद झालेले बहुतांश पोलीस कर्मचारी हे दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

कुणाचे वडील गेले तर कुणाचा मुलगा, एकमेकांना धीर देत होते, पण तिने जे केलं ते पाहून...
SHAHID JAWAN
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

छत्तीसगड : दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटामध्ये 10 पोलिस कर्मचारी आणि एक चालक असे एकूण ११ जण ठार झाले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल जोगा सोधी, मुन्ना राम कडती, संतोष तामो, हवालदार दुल्गो मांडवी, लखमू मरकम, जोगा कावासी, हरिराम मांडवी, खाजगी हवालदार राजू राम करतम, जयराम पोडियाम आणि जगदीश कावासी आणि खाजगी चालक धनीराम यादव हपपेन असे ११ जण शहीद झाले. शहीद झालेल्या पोलिसांपैकी पाच जण पूर्वी नक्षलवादी होते. पण, नक्षलवाद सोडून आत्मसमर्पण करत हे पाच जण पोलिस दलात सामील झाले होते. शहीद झालेले बहुतांश पोलीस कर्मचारी हे दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या या जवानांच्या हौतात्म्याने देश हादरून गेला. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आले. या हल्यात शहीद झालेल्या काहींचा मधुचंद्रच झाला नव्हता तर काहींनी आपला तरुण मुलगा गमावला. अनेक निष्पापांच्या डोक्यावरून वडिलांची सावली हरपली.

हे सुद्धा वाचा

आपल्या शहीद वडिलांचे, मुलांचे पार्थिव घेण्यासाठी आलेली मुले आणि वडीलधारी मंडळी, त्यांचे कुटुंबीय यांच्या अश्रूंचा बांध काही थांबता थांबत नव्हता. पार्थिव नेण्यासाठी आलेल्या रडणाऱ्या मुलाच्या हातात येथील महिला कमांडो खाऊ घालताना आणि त्यांना सांभाळताना दिसत होत्या.

पण, यातील एका घटनेने गावच नव्हे तर शहिदांना सलामी देण्यासाठी आलेल्या जवानांचेही डोळे अश्रुने डबडबले. कासोली गावात शहीद पती लखमू मरकम यांच्यासाठी चिता रचली जात होती. धार्मिक कार्य उरकल्यानंतर चिता पेटवली जात असताना त्यांची पत्नी त्यांच्या चितेवर झोपली.

मधुचंद्राची स्वप्न रंगवत असतानाच पतीच्या मृत्यूची बातमी आली आणि ती कोलमधून पडली. शहीद पतीच्या चितेवर झोपून रडत रडत ती म्हणू लागली, ‘त्यांना अग्नी देण्यापूर्वी आधी मला त्यांच्यापुढे जाळून टाका.’ हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शहीदांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्या आणि त्यांचा तो आक्रोश ऐकून डीआरजीच्या महिला कमांडोनाही रडू आवरले नाही.

DRG ची स्थापना 2008 मध्ये झाली

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांना कमकुवत करण्यासाठी 2008 मध्ये डीआरजीची स्थापना करण्यात आली. ही फौज प्रथम कांकेर आणि नारायणपूर येथे तैनात करण्यात आली. त्यानंतर 2013 मध्ये विजापूर आणि बस्तर, 2014 मध्ये सुकमा आणि कोंडागाव आणि त्यानंतर 2015 मध्ये दंतेवाडा येथे या फौजेची नियुक्ती करण्यात आली होती.

नक्षल भागातील तरुण आणि आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी हे सुरक्षा दलातील सर्वात फायरपॉवर असलेल्या जिल्हा राखीव गार्डमध्ये भरती होतात. डीआरजीमध्ये बहुतांश स्थानिक आदिवासींचा समावेश असून त्यांना माओवाद्यांशी सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येते.