श्रीनगर – कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकांपूर्वी वादही सुरु झाला आहे. पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये गैरकाश्मिरींना मतदानाचा अधिकार देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. म्हणजे जे नागरिक हे मूळचे जम्मू-काश्मीरचे नाही, मात्र या भागात राहत आहेत. त्यांनाही मतदान करण्याचा हक्क असेल. या निर्णयामुळे 20 ते 25 लाख नव्या मतदारांचा समावेश यादीत होणार आहे. यात सर्वाधिक जास्त हे सैन्यदलाचे जवान आणि प्रवासी मजूर यांचा समावेश असेल. राज्य निवडणूक आयोगाच्या या मतदारांबाबतच्यटा घोषणेनंतर जम्मू-काश्मीरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा भाजपाला होईल असे सांगण्यात येते आहे. यावर प्रतिक्रिया देताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की भाजपा विजय मिळवण्यासाठी भाजपा मतदार आयात करीत आहेत.
कागदोपत्री या नव्या निर्णयाने जम्मू काश्मीरमध्ये 30 टक्के मतदान एका झटक्यात वाढणार आहेत. यातील सर्वात मोठी संख्या ही सैन्यदलातील जवानांची असेल. त्यानंतर उ. प्रदेश आणि बिहारमधून जाणारे प्रवासी मजूरही आता जम्मू-काश्मिरात मतदान करु शकतील. जम्मू काश्मीरचे मुख्य निवडणूक आयुक्त ह्रदेश कुमार यांनी सांगितले की, आर्टिकल 370 हटवण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने नवे मतदार जोडले जाणार आहेत. वोटर कार्ड ज्या ठिकाणी स्वताचे कार्ड तयार करतो, तिथेच त्याने राहायला हवे असा नियम आहे. आता निवडणूक आयोगाचे अधिकारी मतदार हा जम्मू काश्मीरमध्ये राहतो की नाही, याचा निर्णय घेणार आहे.
कलम 35 ए हटवण्यापूर्वी दुसऱ्या राज्यआतील नागरिक येऊन जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्यास येऊ शकत नव्हते, तसेच जम्मू काश्मिरात जमीन खरेदी करण्याचा अधिकारही त्यांना नव्हता. या कलमामुळे काश्मिरात राहणाऱ्या दुसऱ्या राज्यातील नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांत मतदान करण्याचा अधिकारही नव्हता. त्यावेळी ते केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच मतदान करण्यास पात्र होते. 35 ए हटवल्यानंतर जे काश्मिरात कायमचे स्थायिक झालेले नसतील त्यांनाही आता मतदार यादीत स्थान मिळणार आहे.
जर मतदार यांद्यत नव्या 33 टकके मतदारांचा समावेश होणार असेल आणि हे मतदार जर दुसऱ्या राज्यांतून जम्मू काश्मीरमध्ये येऊन राहणारे अतील. त्याचा राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या दोन पक्षांचा दबदबा आहे. या ठिकाणी भाजपा त्यांचे संघटन निर्माण करु शकलेली नाही. काँग्रेसचेही राजकीय स्थान फारसे नाही. मतदार याद्यांत नव्याने समावेश होणाऱ्या मतदारांचा प्रादेशिक पक्षांशी फारसा संबंध नसेल. त्यामुळे हे वाढणारे 33 टक्के मतदार हे राष्ट्रीय पक्षांना मतदान करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय पक्षांतही भाजपा याला सर्वाधिक फायदा होईल असे सांगण्यात येते आहे. भाजपा ही निवडणूक मोठ्या जोमाने लढण्याची शक्यता आहे.
पुनर्रचनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये आता 90 जागा असणार आहेत. यातील 7 अनुसूचित जातींसाठी असेल. तर पहिल्यांदाच या ठिकाणी अनुसूचित जमातींना 9 जागा राखीव असतील. 90 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु असल्याचे रज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलेले आहे. 1ऑक्टोबर 2022 पर्यंत ज्याचे वय 18 वर्षे असेल त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार आहे. या बदलामुळे 25 लाख नवे मतदार यादीत असणार आहेत. 25 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
पीडीपीच्या एका नेत्याने सांगितले आहे की – जम्मू, सांबा, उधमपूर, कठुआ, रेयासी, किस्तवाड, डोडा, रामबन सारख्या परिसरात सैन्यदलाचे असलेले जवान यांचे पोस्टींग हे शांततेच्या जागी आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम जम्मूत होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणामुळे काश्मीर खोऱ्यात कमी नोंदणी होण्याचीही शक्यता आहे.