नवी दिल्ली : राज्यात शिंदे गट भाजपसोबत आला. त्यानंतर शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाले. त्याला एक वर्ष झालं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांचे राज्यात सरकार आहे. यापैकी शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांपैकी दोन जणांना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता आले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात कोणाला स्थान मिळते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
येत्या ७२ तासांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन मंत्रीपदं दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला एक मंत्रीपद तर, अजित पवार गटाला एक मंत्रीपद दिलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारी किंवा मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
२० तारखेपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. पुढच्या ७२ तासांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. अजित पवार गटाला एक आणि शिंदे गटाला एक मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्राच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदं आहेत. या चारपैकी दोन मंत्र्यांना मंत्रिपदं गमवावी लागणार आहेत. ते कोण आहेत, ते अद्याप स्पष्ट झालं नाही. परंतु, या दोघांना राजीनामा देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती आहे.
अनेक दिवसांपासून हा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार काँग्रेसमध्ये गेलेत. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होतोय. त्यामुळे आता मंत्रिपद गमवावं लागणारी दोन नाव कोणती. शिवाय कोणत्या दोन खासदारांना मंत्रीपदं मिळणार, हे येत्या ७२ तासांत स्पष्ट होणार आहे.